मुंबई सहकारी बोर्डाची निवडणूक बिनविरोध; सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड संग्रहित छायाचित्र
मुंबई

मुंबई सहकारी बोर्डाची निवडणूक बिनविरोध; सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड

मुंबई सहकारी बोर्डाच्या संचालक मंडळाच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत ‘सहकार पॅनेल’च्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई सहकारी बोर्डाच्या संचालक मंडळाच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत ‘सहकार पॅनेल’च्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. सहकार क्षेत्रातील एकजूट, परस्पर विश्वास आणि संस्थेच्या विकासासाठी सर्वांनी दाखविलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली.

सर्व घटकांना विश्वासात घेऊन मुंबई सहकारी बोर्डाच्या माध्यमातून सहकार चळवळीला अधिक व्यापक आणि गतिमान स्वरूप देऊ, असा विश्वासही प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.

या निवडणुकीत प्रवीण दरेकर, शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ टी. कांबळे, प्रसाद लाड आणि नंदकुमार काटकर यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलच्या उमेदवारांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली.

नवनिर्वाचित संचालकांमध्ये अनिल गजरे, मिलिंद टी. कांबळे, अंकुश रामचंद्र जाधव, अमोल श्रीपती खरात, नितीन धोंडीराम बनकर, सतीश दत्ताराम सावर्डेकर, विजय गोविंद जाधव, शंकर काशिनाथ अय्यप्पा, बाळासाहेब दिनकर घाडगे, मिलिंद गोविंद राऊत, श्रीधर विश्वनाथ जगताप, किशोर दत्तात्रय पाटणकर, प्रवीण डिकले, सुरेश विठ्ठल भालेराव, विठ्ठल ज्ञानेश्वर वाळुंज, जयंत लक्ष्मण शिरसिकर, मदन दादासाहेब यादव, अनिषा माजगावकर आणि वर्षा माळी यांचा समावेश आहे.

या निवडीबद्दल प्रकाश दरेकर, नगरसेवक तथा अध्यक्ष, मुंबई जिल्हा हौसिंग फेडरेशन लि.; विठ्ठलराव भोसले, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कन्झ्युमर्स फेडरेशन लि.; सुनील बांबुळकर, अध्यक्ष, मुंबई-कोकण विभागीय मजूर सहकारी संघ यांनी सर्व नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Railway Travel Insurance : काउंटरवरील तिकिटावरही ४५ पैशांत १० लाखांपर्यंतचा विमा; २७ ऑक्टोबरपासून रेल्वेचा नवा नियम

UPI Payment Failed : खात्यातून पैसे कट झाले, पण पेमेंट फेल? बँकेकडून मिळू शकते रोज १०० रुपयांची नुकसानभरपाई; जाणून घ्या नियम

Thane : भाजप-शिंदे सेनेत 'टोळीयुद्ध'; सत्तेच्या मलिद्यासाठी भांडणाचे नाटक, हर्षवर्धन सपकाळ यांची निष्पक्ष चौकशीची मागणी

हुंड्यासाठी पत्नीचा छळ; थार अन् बाईक न दिल्याने केस धरून रस्त्यावर फरफटवलं, लाथाही मारल्या, पतीचं कृत्य CCTV मध्ये कैद

डॉक्टरांवर वेतनाअभावी उपासमारीची वेळ! सिंधुदुर्गात कामबंद आंदोलन; दोन महिन्यांपासून वेतन थकीत, आंदोलनाचा इशारा