Mumbai : सीएसएमटी स्थानकातील ब्लॉकला मुदतवाढ; अनेक मेल/एक्स्प्रेस गाड्या १३ जूनपर्यंत दादर व ठाणे स्थानकापर्यंतच (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mumbai : सीएसएमटी स्थानकातील ब्लॉकला मुदतवाढ; अनेक मेल/एक्स्प्रेस गाड्या १३ जूनपर्यंत दादर व ठाणे स्थानकापर्यंतच

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मधील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ वरील विविध कामांसाठी मध्य रेल्वेने यापूर्वी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे.

Swapnil S

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मधील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ वरील विविध कामांसाठी मध्य रेल्वेने यापूर्वी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकला रेल्वे प्रशासनाने १३ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत रेल्वेगाड्या दादर आणि ठाणे स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहेत.

रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाद्वारे सीएसएमटी स्थानकाचे आधुनिकीकरण आणि पायाभूत सुविधांचे काम सुरू आहे. सीएसएमटी स्थानकाच्या पायाभूत कामांसाठी सुरुवातीला १ फेब्रुवारी ते २६ एप्रिल या कालावधीत ब्लॉक लागू करण्यात आला होता. त्यानंतर कामाची गरज पाहता ही मुदत २९ मेपर्यंत देण्यात आली होती. आता थेट १३ जून २०२६ पर्यंत ती वाढवण्यात आली आहे. या ब्लॉक कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ वर पायाभूत कामे आणि इतर आवश्यक तांत्रिक कामे केली जात आहेत.

या मुदतवाढीमुळे काही निवडक मेल आणि एक्स्प्रेस गाड्या सीएसएमटीऐवजी दादर आणि ठाणे स्थानकांवरच ‘शॉर्ट टर्मिनेट’ केल्या जाणार आहेत. गाडी क्र. १२११२ अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस, गाडी क्र. ११००२ बल्लारशाह- सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेस, गाडी क्र. १२८१० हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस, गाडी क्र. ११०२० भुवनेश्वर - सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस, गाडी क्र. २२१४४ बिदर- सीएसएमटी एक्स्प्रेस, गाडी क्र. २२१०८ लातूर - सीएसएमटी एक्स्प्रेस, गाडी क्र. २२१२० मडगाव - सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस या गाड्या दादर येथे ‘शॉर्ट टर्मिनेट’ करण्यात आल्या आहेत. तर गाडी क्र. १२१३४ मंगळूर - सीएसएमटी एक्स्प्रेस ठाणे येथे ‘शॉर्ट टर्मिनेट’ करण्यात आली आहे.

दुष्काळाचा ३ टप्प्यांत आढावा; राज्य सरकारकडून मदत; उपाययोजनांना सुरुवात, ५ ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार

हेक्टरी १ लाख मदत, पूर्ण कर्जमाफी द्या : हर्षवर्धन सपकाळ

पुण्यात दोन CA विरोधात गुन्हा; 'शेल'च्या माध्यमातून ४,४२७ कोटींची करचुकवेगिरी

प्राध्यापकावर कारवाई; IIT मुंबईतील विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी संस्थेने मागितली माफी; गेल्या २० वर्षांत १६० विद्यार्थ्यांची आत्महत्या

ठाण्याला पावसाने झोडपले; राज्यातील अनेक भागांना यलो अलर्ट