Mumbai : सीएसएमटी स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी 
मुंबई

Mumbai : सीएसएमटी स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा दूरध्वनी आल्यानंतर शनिवारी सायंकाळी रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षा यंत्रणांनी धाव घेतली.

Swapnil S

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा दूरध्वनी आल्यानंतर शनिवारी सायंकाळी रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षा यंत्रणांनी धाव घेतली.

रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), लोहमार्ग पोलीस (जीआरपी), मुंबई पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तपणे स्थानकाची कसून तपासणी केली. मात्र, या तपासणीत कोणतीही संशयास्पद व्यक्ती, स्फोटक सामग्री किंवा वस्तू आढळून आली नाही. ६.४० वाजण्याच्या सुमारास वाडीबंदर येथील जीआरपी नियंत्रण कक्षाला सीएसएमटी स्थानकावर बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा दूरध्वनी आल्याची माहिती मिळाली.

या माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने विविध सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले. त्यानंतर संयुक्त तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. आरपीएफच्या श्वानपथकानेही स्थानकातील विविध भागांची तपासणी केली. उपनगरीय रेल्वे फलाट, मेल-एक्स्प्रेस फलाट, पादचारी पूल, पार्सल विभाग तसेच स्थानक परिसरातील अन्य ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली. स्थानकात उभ्या असलेल्या गाड्यांचीही तपासणी करण्यात आली.

दीर्घकाळ चाललेल्या या तपासणीत कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा वस्तू आढळली नसल्याने सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, धमकीचा दूरध्वनी कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला, याबाबत तपास सुरू आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कंपन्यांनी थकवला २३३ कोटी मालमत्ता कर; दहा ते १५ वर्षांपासून BMC ला वसुलीत अपयश

आरोग्य क्षेत्र आयसीयूत; केंद्राच्या अहवालातून महाराष्ट्राचे जळजळीत वास्तव उघड

आदिवासींचा मताधिकारही नाकारला; पंतप्रधान मोदी यांचा काँग्रेसवर आरोप

महायुतीने एकदिलाने काम करण्याची गरज!

सहकाराच्या समृद्धीवरील 'गोकुळ'चा थांबा