Mumbai : उद्यापासून डिजिहेल्थ कनेक्ट अभियान राबवणार; १०० दिवसांत अधिकाधिक नागरिकांचे आभा कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : उद्यापासून डिजिहेल्थ कनेक्ट अभियान राबवणार; १०० दिवसांत अधिकाधिक नागरिकांचे आभा कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मुंबई डिजिहेल्थ कनेक्ट (एमडीसी) अभियान १०० दिवसांच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ २ ऑक्टोबर रोजी होणार असून २ ऑक्टोबरपासून १०० दिवसांच्या कालवधीसाठी मुंबई महापालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागात राबविण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मुंबई डिजिहेल्थ कनेक्ट (एमडीसी) अभियान १०० दिवसांच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ २ ऑक्टोबर रोजी होणार असून २ ऑक्टोबरपासून १०० दिवसांच्या कालवधीसाठी मुंबई महापालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागात राबविण्यात येणार आहे.

अभियानअंतर्गत मुंबईतील अधिकाधिक पात्र नागरिकांचे आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट (आभा) कार्ड निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासोबतच ७० हून अधिक वयोमान असलेल्या जेष्ठ नागरिकांचे आयुष्मान वय वंदना कार्ड तयार करण्याचेही उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

नागरिकांच्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने आभा कार्डची उपलब्धतता ही अत्यंत मदतीची ठरणार आहे. त्यामुळे आरोग्याच्या अनुषंगाने उपचारांची उपलब्धतता सहजरित्या होण्यासाठी हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे. त्यामुळे अधिकाधिक मुंबईकरांनी या अभियानात सहभाग व्हावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी केले आहे.

मुंबईतील मोठ्या प्रमाणात नागरिकांना आभा कार्डच्या माध्यमातून फायदा व्हावा, यादृष्टीने महानगरपालिकेच्या यंत्रणेच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या अभियानासाठी नागरिकांनी चांगला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कामगिरीचा आढावा घेणार

मुंबई डिजिहेल्थ कनेक्ट अभियानासाठी प्रामुख्याने वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याकडे महत्वाची जबाबदारी असणार आहे. अधिकाधिक नागरिकांना आभा कार्डच्या नोंदणीमध्ये समाविष्ट करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक प्रशासकीय विभागाचे सहायक आयुक्त आणि उपायुक्त आभा कार्ड नोंदणी अभियानाच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत महत्वाच्या अभियानात मुंबईकर नागरिकांना सक्रियपणे सहभागी करून घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही, पण २४ तास फोडण्याचीही मुभा नाही; सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट पवित्रा

आधार प्रमाणीकरण सक्तीचे; मालमत्ता खरेदी-विक्रीबाबत अधिसूचना जारी, आजपासून अंमलबजावणी

टाटा ट्रस्टमधील वाद शिगेला; वेणू श्रीनिवासन यांची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार, प्रशासकीय कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी

Mumbai : झोपड्यांवर कारवाई तर होणारच; महापालिका भूमिकेवर ठाम

Mumbai : विमान उड्डाण सुरक्षेला मोठा धोका; हवाई वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांचा दावा, नव्या डिस्प्ले सिस्टीममुळे अधिकाऱ्यांना त्रास