दिवा रेल्वे फाटक खुले, प्रवाशांची रखडपट्टी; नऊ लोकल, सहा एक्स्प्रेस गाड्यांना विलंब प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

दिवा रेल्वे फाटक खुले, प्रवाशांची रखडपट्टी; नऊ लोकल, सहा एक्स्प्रेस गाड्यांना विलंब

दिवा रेल्वे स्थानकाजवळील रस्ते वाहतुकीला मार्ग देण्यासाठी रेल्वे फाटक १८ मिनिटे खुले ठेवल्याने बुधवारी दुपारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे नऊ लोकल गाड्या स्थानकांदरम्यान अडकून पडल्या, तर ३० हून अधिक उपनगरीय लोकल गाड्यांना विलंब झाला. सहा लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांनाही याचा फटका बसला.

Swapnil S

मुंबई : दिवा रेल्वे स्थानकाजवळील रस्ते वाहतुकीला मार्ग देण्यासाठी रेल्वे फाटक १८ मिनिटे खुले ठेवल्याने बुधवारी दुपारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे नऊ लोकल गाड्या स्थानकांदरम्यान अडकून पडल्या, तर ३० हून अधिक उपनगरीय लोकल गाड्यांना विलंब झाला. सहा लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांनाही याचा फटका बसला. सणासुदीच्या गर्दीच्या काळात हजारो प्रवाशांना या गैरसोयीचा सामना करावा लागला.

दिवा येथील रेल्वे फाटकावर दुपारी १.३५ ते १.५३ या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली होती. वाहनांना वेळेत रस्ता मोकळा करता न आल्याने रेल्वे प्रशासनाला फाटक बंद करता आले नाही. परिणामी उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. डोंबिवली आणि कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा परिणाम झाला. अनेक गाड्या रोखून धराव्या लागल्या. विलंबामुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली. त्यामुळे प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबांना त्रास सहन करावा लागला.

उड्डाणपूलाचे काम लवकरच करण्याची गरज

दिवा रेल्वे फाटकावरील बुधवारी घडलेला प्रकार म्हणजे दैनंदिन प्रवाशांसाठी आणखी एक धोक्याची घंटा आहे. रखडलेला उड्डाणपूल हा केवळ रस्ते पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्न नसून, त्याचा थेट परिणाम रेल्वेच्या वक्तशीरपणावर होत आहे. रस्त्यावरील वाहतुकीचा ताण फाटकावर वाढला की हजारो रेल्वे प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागतो. त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मदर डेअरी, अमूल दूध महागले; प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू

Mumbai : दिवाळीत हवेचे 'दिवाळे'! नेव्ही नगरमध्ये AQI ४९७, तर शिवडीत ४५२ वर पोहोचला

राज्यात लवकरच समान नागरी कायदा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार

नवी मुंबई सर्वाधिक स्वच्छ शहर; देशातील सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये पटकावला प्रथम क्रमांक

कोकण किनाऱ्यांचा जागतिक गौरव; गुहागर, लाडघर, श्रीवर्धन समुद्रतटांना आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा 'ब्ल्यू फ्लॅग' पुरस्कार