बनावट प्रमाणपत्र प्रकरणात गुन्हे तत्काळ दाखल करा, महापौर रितू तावडेंचे निर्देश; ८७ हजार अवैध जन्म प्रमाणपत्रांचा घोटाळा उघड, चौकशीसाठी SIT स्थापन 
मुंबई

बनावट प्रमाणपत्र प्रकरणात गुन्हे तत्काळ दाखल करा, महापौर रितू तावडेंचे निर्देश; ८७ हजार अवैध जन्म प्रमाणपत्रांचा घोटाळा उघड, चौकशीसाठी SIT स्थापन

मुंबई महानगरपालिकेतून अवैधरीत्या जारी करण्यात आलेल्या हजारो जन्म व जात प्रमाणपत्रांच्या प्रकरणात महापौर रितू तावडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे मुंबईत अवैध घुसखोरी करणाऱ्यांवर तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश महापौर रितू तावडे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतून अवैधरीत्या जारी करण्यात आलेल्या हजारो जन्म व जात प्रमाणपत्रांच्या प्रकरणात महापौर रितू तावडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे मुंबईत अवैध घुसखोरी करणाऱ्यांवर तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश महापौर रितू तावडे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.

भाजप नेते किरिट सोमय्या यांनी उघड केलेल्या या घोटाळ्याचे स्वरूप दिवसेंदिवस व्यापक होत असून, सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून सोमय्या हा मुद्दा सातत्याने मांडत आहेत. तपासादरम्यान पालिकेच्या २६ विभागांतून एकूण ८७,३४७ अवैध जन्म प्रमाणपत्रे जारी झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात बांगलादेशी घुसखोरांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेषतः ई-वॉर्ड, एल-वॉर्ड, भायखळा, गोवंडी आणि देवनार परिसरात मोठ्या प्रमाणावर अशी प्रमाणपत्रे दिल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत महापौरांनी आरोग्य विभागातील काही जुन्या अधिकाऱ्यांचे बदली करून नव्या नियुक्त्या करण्याचे निर्देश दिले आहेत. बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात आतापर्यंत ११९ जणांवर कारवाई करण्यात आली असून, संबंधित बनावट नावे पोर्टलवरून हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

“दोषी अधिकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही,” असा इशारा महापौरांनी दिला.

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार