मुंबईत बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा; विना कागदपत्रांच्या आधारे वाटप 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

मुंबईत बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा; विना कागदपत्रांच्या आधारे वाटप

मुंबईत बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघड झाला आहे. शहरात १० हजारांहून अधिक बनावट प्रमाणपत्र वाटप झाले असून यासाठी कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले.

गिरीश चित्रे

मुंबई : मुंबईत बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघड झाला आहे. शहरात १० हजारांहून अधिक बनावट प्रमाणपत्र वाटप झाले असून यासाठी कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले.

मुंबईत ८७,३४८ बनावट जन्म प्रमाणपत्र वाटपाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहे. या प्रकरणाची चौकशीसाठी स्थापन केलेल्या एसआयटीला माहिती सादर करण्यात येणार आहे.

पालिकेच्या सर्व २६ वॉर्डांमधून एकूण ८७ ३४७ जन्म प्रमाणपत्रे वाटप झाल्याने आरोग्य विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ई, एल, भायखळा, गोवंडी आणि देवनार परिसरात जन्म प्रमाणपत्र वाटपात अनियमितता झाल्याचे प्राथमिक तपासात आढळले. याची गंभीर दखल घेत महापौर रितू तावडे यांनी आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत.

‘सॅप’ प्रणालीतून झाला मोठा खेळ?

बंद झालेल्या ‘सॅप’ प्रणालीचा वापर करून ८७ हजार ३४७ जन्म प्रमाणपत्रे जारी केल्याचा आरोप होत आहे. त्याच काळात नव्या सीएसआर पोर्टलवर ३३७७२ नोंदी करण्यात आल्या. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या प्रणालींमधून नोंदी आणि प्रमाणपत्रे जारी झाल्याने हा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमतातून झालेला मोठा घोटाळा असल्याचा आरोप भाजप नेत्याने केला होता. त्यानंतर चौकशी सुरू झाली.

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; आतापर्यंत १२ लाख ५८ हजार शेतकऱ्यांना लाभ

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

VIP दर्शनावरून मंदिरात राडा; आमदाराच्या मुलीने महिला PSI च्या कानशिलात लगावली, प्रत्युत्तरात पोलिसानेही उगारला हात, Video

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड