मुंबई अग्निशमन दलाच्या १०१ क्रमांकाला ५ पर्याय; आपत्कालीन सेवा अधिक सक्षम होणार; वर्षाला १५ हजारांहून अधिक आपत्कालीन कॉल 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

मुंबई अग्निशमन दलाच्या १०१ क्रमांकाला ५ पर्याय; आपत्कालीन सेवा अधिक सक्षम होणार; वर्षाला १५ हजारांहून अधिक आपत्कालीन कॉल

आग, इमारत कोसळणे, अपघात, झाडे उन्मळून पडणे किंवा पाण्यात बुडण्यासारख्या आपत्कालीन घटनांमध्ये नागरिकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी मुंबई अग्निशमन दलाने १०१ या आपत्कालीन क्रमांकासह पाच पर्यायी भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत.

Swapnil S

मुंबई : आग, इमारत कोसळणे, अपघात, झाडे उन्मळून पडणे किंवा पाण्यात बुडण्यासारख्या आपत्कालीन घटनांमध्ये नागरिकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी मुंबई अग्निशमन दलाने १०१ या आपत्कालीन क्रमांकासह पाच पर्यायी भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. १०१ क्रमांकाच्या दूरध्वनी सेवेत तांत्रिक बिघाड झाल्यास नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि मदतकार्यात विलंब होऊ नये, हा या पर्यायी व्यवस्थेमागील उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबई अग्निशमन दलाचा १०१ हा आपत्कालीन क्रमांक महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या (एमटीएनएल) माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, या दूरध्वनी सेवेत वारंवार तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता असते. तसेच दुरुस्तीसाठी मनुष्यबळाची कमतरता असल्याने सेवा खंडित झाल्यास नागरिकांना अग्निशमन दलाशी संपर्क साधण्यात अडचणी येऊ शकतात. ही अडचण टाळण्यासाठी पर्यायी भ्रमणध्वनी क्रमांकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

वर्षाला १५ हजारांहून अधिक आपत्कालीन कॉल

मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षात दरवर्षी १५ हजारांहून अधिक आपत्कालीन दूरध्वनी प्राप्त होतात. आगीच्या घटनांव्यतिरिक्त इमारत कोसळणे, वाहनांचे अपघात, प्राणी-पक्षी अडकणे, समुद्रात किंवा तलावात व्यक्ती बुडणे, झाडे कोसळणे तसेच रस्त्यावर तेल सांडणे अशा विविध घटनांमध्ये अग्निशमन दलाला तातडीने मदतकार्य करावे लागते. सध्या नियंत्रण कक्षात १०१ हा प्रमुख आपत्कालीन क्रमांक असून, त्याशिवाय संपर्कासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नव्हती. मोठ्या दुर्घटनेच्या वेळी या क्रमांकावर मोठ्या प्रमाणात कॉल आल्यास अन्य दूरध्वनी कामकाजावरही परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्यायी क्रमांक उपलब्ध झाल्याने आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधणे अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

नागरिकांनी गरजेच्या वेळी खालील पाच पर्यायी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन अग्निशमन दलाकडून करण्यात आले आहे.

९०७६३३३१०१

९०७६३३३१०२

९०७६३३३१०३

९०७६३३३१०४

९०७६३३३१०५

३५ अग्निशमन केंद्रांद्वारे सेवा

मुंबईकरांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे आगीसह विविध आपत्तींपासून संरक्षण करण्याची जबाबदारी मुंबई अग्निशमन दल पार पाडते. सध्या दलाची ३५ अग्निशमन केंद्रे, भायखळा येथे मुख्य नियंत्रण कक्ष, तसेच भायखळा, वडाळा, मरोळ, बोरिवली, मानखुर्द आणि विक्रोळी येथे सहा प्रादेशिक समादेश केंद्रे कार्यरत आहेत. याशिवाय १९ लघु अग्निशमन केंद्रे आणि २२ जलद प्रतिसाद वाहनेही सेवेत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क व्यवस्था अखंडित राहणे महत्त्वाचे असल्याने नागरिकांनी १०१ क्रमांकासह पर्यायी भ्रमणध्वनी क्रमांकही नोंदवून ठेवावेत, असे आवाहन अग्निशमन दलाने केले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

अनावश्यक खर्चावर नियंत्रण; वित्त विभागाचे सर्व खात्यांना निर्देश जारी

अविनाश भोसलेंच्या जप्त केलेल्या मालमत्तांवरील टाच हटवण्याचे आदेश; हायकोर्टाचा ED ला मोठा झटका; न्यायालय म्हणते...

Mumbai : अखेर ३० महिन्यांनंतर सायन पूल सेवेत; विद्याविहार, गोरेगाव-मुलुंड उड्डाणपुलांचे आज लोकार्पण

'निष्पक्ष निवडणुकीसाठी हात बांधलेले नाहीत' - सर्वोच्च न्यायालय

न्यूझीलंडची वारी आजपासून! टी-२० मालिकेसाठी भारत सज्ज; वातावरणाशी जुळवून घेण्याचे आव्हान