प्रथमच 'फायर इंजिन'चे स्टेअरिंग महिलेच्या हाती; आत्मविश्वास असेल तर अशक्य ही शक्य - पल्लवी पाटील यांचा विश्वास 
मुंबई

प्रथमच 'फायर इंजिन'चे स्टेअरिंग महिलेच्या हाती; आत्मविश्वास असेल तर अशक्य ही शक्य - पल्लवी पाटील यांचा विश्वास

आग लागली, झाड कोसळले, इमारत कोसळली, झाडावर पक्षी अडकला तर पहिला फोन खणखणतो तो मुंबई अग्निशमन दलाला. दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य करणे हेच जवानांचे प्रथम कर्तव्य असते. अशा आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या मुंबई अग्निशमन दलात प्रथमच ‘फायर इंजिन’चे स्टेअरिंग महिलेच्या हाती आले आहे. पल्लवी पाटील या मुंबई अग्निशमन दलात पहिल्या ‘फायर इंजिन’चालक ठरल्या आहेत.

Swapnil S

मुंबई : आग लागली, झाड कोसळले, इमारत कोसळली, झाडावर पक्षी अडकला तर पहिला फोन खणखणतो तो मुंबई अग्निशमन दलाला. दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य करणे हेच जवानांचे प्रथम कर्तव्य असते. अशा आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या मुंबई अग्निशमन दलात प्रथमच ‘फायर इंजिन’चे स्टेअरिंग महिलेच्या हाती आले आहे. पल्लवी पाटील या मुंबई अग्निशमन दलात पहिल्या ‘फायर इंजिन’चालक ठरल्या आहेत.

‘अग्निशमन दलात कार्यरत असताना आव्हानात्मक काम करण्याची इच्छाशक्ती, त्यामुळे ‘फायर इंजिन’ चालवण्याच्या सगळ्या परीक्षा उत्तीर्ण झाले आणि ‘फायर इंजिन’ची कमांड हाती घेतली. ‘फायर इंजिन’चे स्टेअरिंग हाती घेतल्यानंतर तीन कॉल अटेंड केले असून मुंबईच्या रस्त्यांवर गाडी चालवणे खरेच चॅलेंजिंग आहे. परंतु आत्मविश्वास असेल तर अशक्य ही शक्य आहे’, असा विश्वास मुंबई अग्निशमन दलातील पहिल्या फायर इंजिनचालक ठरलेल्या पल्लवी पाटील यांनी व्यक्त केला.

मुंबई अग्निशमन दलात पुरुषांबरोबर महिलाही मुंबईकरांसाठी जिवाची बाजी लावून काम करत आहेत. जिवाची बाजी लावत दुसऱ्यांचा जीव वाचवण्याचे काम मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान करतात. आडव्या-उभ्या वाढलेल्या मुंबईचा विकास झपाट्याने होत आहे. परंतु त्या तुलनेत अरुंद रस्ते, रस्त्यांच्या दुतर्फा बेकायदा वाहन पार्किंग हे आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलासाठी अडथळे ठरत आहेत. माझे मिस्टर समाधान पाटील हे देखील अग्निशमन दलात कार्यरत असून तेही वाहन चालवतात, असे पल्लवी पाटील यांनी नमूद केले.

मुंबई अग्निशमन दलात ‘फायर वुमन’ म्हणून आठ वर्षे सेवा केली. मला स्वतःला आव्हानात्मक काम करण्याची पहिल्यापासून आवड होती. त्यामुळे गावी असताना अवजड वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर अग्निशमन दलात कार्यरत राहून दिंडोशी बस आगारात २० दिवस बस चालवण्याचे प्रशिक्षण घेतले.

जीवनात रिस्क घेणे गरजेचे!

अग्निशमन दलाचा जॉब ‘रिस्की’ असला तरी जीवनात ‘रिस्क’ घेतल्याशिवाय कुठलेच काम होत नाही. त्यामुळे आव्हान स्वीकारत आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. महिला आज प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असून मुंबईकरांच्या सेवेसाठी महिला आज अग्निशमन दलात कार्यरत आहेत, हा मोठा अभिमानाचा क्षण आहे, असेही पाटील म्हणाल्या.

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती