नॉन-एसी लोकलमध्ये आता ऑटोमॅटिक दरवाजे; कुर्ला कारशेडमध्ये नव्या EMU रेकचे आगमन, पाहा VIDEO 
मुंबई

Mumbai : नॉन-एसी लोकलमध्ये आता ऑटोमॅटिक दरवाजे; कुर्ला कारशेडमध्ये नव्या EMU रेकचे आगमन, पाहा VIDEO

मुंबईत पहिली नॉन-एसी लोकल ट्रेन ऑटोमॅटिक दरवाजा प्रणालीसह दाखल झाली असून, कुर्ला कारशेडमध्ये नव्या EMU रेकचे आगमन झाले आहे. उघड्या दरवाज्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी रेल्वेचा हा मोठा निर्णय मानला जात आहे.

Mayuri Gawade

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल उचलत मुंबईत पहिली नॉन-एसी लोकल ऑटोमॅटिक दरवाजा बंद प्रणालीसह दाखल झाली आहे. सोमवारी नव्या इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (EMU) रेकचं कुर्ला कारशेडमध्ये आगमन झालं असून, शहराच्या उपनगरी रेल्वेच्या आधुनिकीकरणातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

गर्दीत उघड्या दरवाज्यातून प्रवास करताना होणारे अपघात कमी करण्याच्या उद्देशाने ही नवी प्रणाली आणण्यात आली आहे.

सुरक्षा चिंतेनंतर निर्णय

गेल्या काही काळात प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली होती. विशेषतः मुंब्रा दुर्घटनेसारख्या घटनांनंतर उघड्या दरवाज्यांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला. अधिकाऱ्यांच्या मते, पीक अवरमध्ये दरवाज्याजवळ उभे राहण्यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी ऑटोमॅटिक दरवाजा प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.

रेल्वेसाठी महत्त्वाची सुरुवात

नॉन-एसी लोकलमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे बसवण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. १२ डब्यांचा हा रेक चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आला आहे. भविष्यात एसी आणि नॉन-एसी अशा सर्व लोकल गाड्यांमध्ये बंद दरवाजा प्रणाली लागू करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे.

आधुनिक रचना आणि सुविधा

या नव्या लोकलमध्ये डबे एकमेकांना जोडलेले आहेत, त्यामुळे प्रवाशांना डब्यांदरम्यान सहज हालचाल करता येईल.. सलग अंतर्गत रचनेमुळे प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. तसंच, पारंपरिक अनुभव कायम ठेवण्यासाठी स्लायडिंग पॅन असलेल्या खिडक्या देण्यात आल्या आहेत. महिलांसाठी राखीव डबा गाडीच्या एका टोकाला असणार आहे.

पाहा VIDEO

सुरक्षा चाचण्यांनंतरच सेवा सुरू

प्रवाशांसाठी ही लोकल सुरू करण्यापूर्वी विविध सुरक्षा चाचण्या घेतल्या जाणार आहेत. यामध्ये हाय-स्पीड सेफ्टी टेस्ट, लोड चाचण्या आणि अंतिम प्रवासी चाचण्या यांचा समावेश असेल. मुंबईसारख्या गर्दीच्या परिस्थितीत ही गाडी सुरक्षित आणि प्रभावीपणे चालेल याची खात्री करण्यासाठी या चाचण्या महत्त्वाच्या असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

ठाण्यात खळबळ! ठाकरेंच्या नेत्याची निर्घृण हत्या; दोन संशयित ताब्यात, कुटुंबीयांकडून गंभीर आरोप

LPG Cylinder New Rules : १ ऑक्टोबरपासून बदलणार सिलिंडरचे 'हे' ५ नियम; बुकिंग करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Mumbai : १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर...CSMT वर ७५ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

"शिकवायला येतात की Instagram ID मागायला?" वर्गात मोबाईलवर गेम खेळणाऱ्या शिक्षकावर विद्यार्थिनीचे गंभीर आरोप, VIDEO

कल्याण : RTO च्या तीन एकर जागेवर अतिक्रमण; रस्त्यावर ड्रायव्हिंग टेस्ट घेण्याची वेळ, तात्पुरती व्यवस्था करण्याचे आवाहन