Mumbai : वनमंत्र्यांच्या 'पावनगड' बंगल्यात आग; एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे अग्नी भडका सर्व छायाचित्रे : विजय गोहिल
मुंबई

Mumbai : वनमंत्र्यांच्या 'पावनगड' बंगल्यात आग; एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे अग्नी भडका

मंत्रालयासमोरील आमदार निवास परिसरातील वनमंत्री गणेश नाईक यांच्या शासकीय ‘पावनगड’ बंगल्यात बुधवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. बंगल्यातील स्प्लिट एसी युनिटमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Swapnil S

मुंबई : मंत्रालयासमोरील आमदार निवास परिसरातील वनमंत्री गणेश नाईक यांच्या शासकीय ‘पावनगड’ बंगल्यात बुधवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. बंगल्यातील स्प्लिट एसी युनिटमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

एसी युनिटजवळील सोफा आणि पडद्यांनी पेट घेतल्याने काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. अग्निशमन दलाने तासाभराहून अधिक काळ शर्थीचे प्रयत्न करून दुपारी १ वाजून २६ मिनिटांनी आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. मात्र, बंगल्यातील फर्निचर, विद्युत उपकरणे, कार्यालयीन कागदपत्रे आणि अन्य साहित्याचे नुकसान झाले.

मंत्रालयासमोर आमदार निवास परिसरातील वनमंत्री गणेश नाईक याचा ‘पावनगड’ हा शासकीय बंगला आहे. बुधवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास पावनगड बंगल्यात अग्नी भडका उडाला.‌ बंगल्यातील एसी युनिटमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाले. त्यानंतर जवळच असलेल्या सोफा आणि पडद्यांनी पेट घेतला.

कागदपत्रे खाक!

आगीत विद्युत वायरिंग, विद्युत उपकरणे, स्प्लिट एसी युनिट, स्वयंपाकघरातील साहित्य, कार्यालयीन फाइल्स आणि कागदपत्रे, लाकडी फर्निचर, फ्रिज तसेच फॉल्स सिलिंगचे नुकसान झाले आहे. बंगल्यातील विविध साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. बंगल्यात असलेल्या फाईल कागदपत्रे जळून खाक झाली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मदर डेअरी, अमूल दूध महागले; प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू

Mumbai : दिवाळीत हवेचे 'दिवाळे'! नेव्ही नगरमध्ये AQI ४९७, तर शिवडीत ४५२ वर पोहोचला

राज्यात लवकरच समान नागरी कायदा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार

नवी मुंबई सर्वाधिक स्वच्छ शहर; देशातील सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये पटकावला प्रथम क्रमांक

कोकण किनाऱ्यांचा जागतिक गौरव; गुहागर, लाडघर, श्रीवर्धन समुद्रतटांना आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा 'ब्ल्यू फ्लॅग' पुरस्कार