Mumbai : गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज; ३८३ कृत्रिम तलाव; १,१३२ जीवरक्षक तैनात संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज; ३८३ कृत्रिम तलाव; १,१३२ जीवरक्षक तैनात

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने गणेशभक्तांच्या सुरक्षिततेसह स्वच्छता, वाहतूक नियंत्रण, आरोग्य आणि विसर्जन व्यवस्थेसाठी जय्यत तयारी केली आहे.

Swapnil S

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने गणेशभक्तांच्या सुरक्षिततेसह स्वच्छता, वाहतूक नियंत्रण, आरोग्य आणि विसर्जन व्यवस्थेसाठी जय्यत तयारी केली आहे. यंदा विसर्जनासाठी ६७नैसर्गिक स्थळांसह ३८३ कृत्रिम तलाव उपलब्ध केले आहेत.

तीन हजारांहून अधिक सफाई कर्मचारी, मोबाईल कचरा गाड्या तसेच स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. निर्माल्य संकलनासाठी ठिकठिकाणी ४९८ निर्माल्य कलश व ३२६ निर्माल्य वाहन आणि विसर्जन स्थळी १,१३२ लाइफ गार्ड तैनात असणार आहेत. मुंबईत दरवर्षी १२ हजारांहून अधिक सार्वजनिक आणि दोन लाखांहून अधिक घरगुती गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या नियोजनाला महापालिका काही महिने आधीपासूनच सुरुवात करते. यंदाही पोलीस, बेस्ट, गणेशोत्सव मंडळे, वीज वितरण कंपनी तसेच अन्य संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

विसर्जनस्थळी गर्दीचे नियोजन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी २२८ नियंत्रण कक्ष, १,१३२ जीवरक्षक, १० मोटरबोटी, २३ जर्मन तराफे, ६,०५२ फ्लडलाइट व सर्चलाइट, २३६ प्रथमोपचार केंद्रे, ७५ निरीक्षण मनोरे आणि ८५ रुग्णवाहिका तैनात आहेत.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Sindhudurg : महाराष्ट्राच्या गणेशोत्सव परंपरेचे होणार जागतिक दस्तावेजीकरण; 'Bappa.org' मंचावर नागरिकांना सहभागाचे आवाहन

भारतीय दृष्टिकोनातून इतिहास मांडणे गरजेचे; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

Thane : गणरायाच्या स्वागतासाठी ठाणे जिल्हा सज्ज; १ लाख ८२ हजार गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना, विसर्जनासाठी १९३ ठिकाणी व्यवस्था

रशियाची भारतातून विक्रमी इंधन आयात; युक्रेनच्या हल्ल्यांमुळे देशांतर्गत शुद्धीकरण क्षमता बाधित

Thane : पावसामुळे गणेशोत्सवाच्या तयारीत व्यत्यय; शहरातील काही भागांत पाणी साचले, वाहतुकीवरही परिणाम