Mumbai : गणेशोत्सव मंडळांसाठी ऑनलाइन 'एक खिडकी' योजना 
मुंबई

Mumbai : गणेशोत्सव मंडळांसाठी ऑनलाइन 'एक खिडकी' योजना

सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीची परवानगी सुलभतेने मिळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने यंदाही ऑनलाइन 'एक खिडकी' प्रणाली सुरू केली आहे. मंडप परवानगीसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, मंडळांना १३ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

Swapnil S

मुंबई : सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीची परवानगी सुलभतेने मिळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने यंदाही ऑनलाइन 'एक खिडकी' प्रणाली सुरू केली आहे. मंडप परवानगीसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, मंडळांना १३ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

मनपा 'नागरिकांकरिता (सार्वजनिक संकेतस्थळावरील मंडप गणेशोत्सव /नवरात्रोत्सव इतर उत्सव)' या सुविधेद्वारे मंडळांना अर्ज करता येणार आहे. अर्जाची विभाग कार्यालयामार्फत छाननी केल्यानंतर स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडून 'ना-हरकत' प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

गणेशोत्सवादरम्यान गर्दीचे नियोजन, अग्निसुरक्षा, प्रथमोपचार आणि सुव्यवस्था याबाबत प्रत्येक मंडळाच्या दोन स्वयंसेवकांना एकदिवसीय प्रशिक्षण घेणे आवश्यक करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण विभाग कार्यालयाच्या स्तरावर आयोजित करण्यात येणार आहे.

नवीन मंडळांसाठीही ऑनलाइन अर्ज

सार्वजनिक किंवा खासगी जागेवर प्रथमच गणेशोत्सव मंडप उभारणाऱ्या मंडळांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. विभाग कार्यालयाची छाननी, स्थानिक पोलीस व वाहतूक पोलिसांचे 'ना-हरकत' प्रमाणपत्र आणि परिमंडळीय उपआयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर १०० रुपये शुल्क भरून मंडपाची परवानगी देण्यात येणार आहे.

रस्ते, पदपथांवर खड्डे खोदण्यास मनाई !

मंडप उभारण्यासाठी रस्ते किंवा पदपथांवर खड्डे खोदण्यास महापालिकेने स्पष्ट मनाई केली आहे. मंडळांनी खड्डेविरहित मंडप उभारणीच्या तंत्राचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Independence Day 2026 : 'वंदे मातरम्'च्या जयघोषाने दुमदुमला लाल किल्ला; ८०व्या स्वातंत्र्यदिनाचा ऐतिहासिक क्षण, Videos

Independence Day 2026 : 'सप्तधारा', विकसित भारत अन् आत्मनिर्भरता; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर

मुंबई अग्निशमन दलाच्या १३ जवानांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक

नैसर्गिक जलस्रोतात विसर्जनास बंदी; उच्च न्यायालयाचा निर्णय

कुत्र्यांची 'नसबंदी' वेगाने करा! उच्च न्यायालयाचे आदेश