गारगाईसाठी साडेचार लाख झाडांचा बळी; पर्यावरण अभ्यासक स्टॅलिन डी. यांचा दावा, तानसातच ३ लाख वृक्षांचे पुनर्रोपण - बांगर संग्रहित छायाचित्र
मुंबई

गारगाईसाठी साडेचार लाख झाडांचा बळी; पर्यावरण अभ्यासक स्टॅलिन डी. यांचा दावा, तानसातच ३ लाख वृक्षांचे पुनर्रोपण - बांगर

बेसुमार वृक्षतोडीमुळे कर्जत तालुक्यातील पाली-सायडोंगर परिसरातील प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाला विरोध होत असतानाच, आता मुंबईची पाण्याची गरज भागवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या गारगाई धरण प्रकल्पासाठी तब्बल साडेचार लाख झाडांवर गंडांतर येणार आहे.

गिरीश चित्रे

मुंबई : बेसुमार वृक्षतोडीमुळे कर्जत तालुक्यातील पाली-सायडोंगर परिसरातील प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाला विरोध होत असतानाच, आता मुंबईची पाण्याची गरज भागवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या गारगाई धरण प्रकल्पासाठी तब्बल साडेचार लाख झाडांवर गंडांतर येणार आहे. गारगाई प्रकल्पासाठी तीन लाख आणि सहा गावांचे पुनर्वसन करताना आणखी दीड लाख अशी साडेचार लाख झाडांची कत्तल करण्यात येणार असल्याचा दावा पर्यावरण अभ्यासक स्टॅलिन डी. यांनी केला आहे.

गारगाई प्रकल्पातील तीन लाख झाडांचे पुनर्रोपण तानसा परिसरातच करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. गारगाई धरण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईला ४४० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी मिळणार आहे.

गारगाई धरण प्रकल्प राबवत असताना सहा गावे बाधित होणार असून यात दोन गावे बुडीत क्षेत्रात येतात. तर चार गावांचे पुनर्वसन वाडा तालुक्यातील देवळी गावातील ३३४ हेक्टर जमिनीवर करण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पातील तीन लाख झाडे तानसा धरणाजवळ ५ किलोमीटर अंतरावर पुनर्रोपित करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. या प्रकल्पांतर्गत चंद्रपूर, हिंगोली, वाशिम जिल्ह्यात ६५८ हेक्टर जमिनीवर नवीन झाडे लावली जाणार असून या ठिकाणच्या वनक्षेत्रात हिरवळीची भर पडणार आहे.

मे २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्णत्वासमुंबईला सात धरणांतून दररोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. परंतु वाढती लोकसंख्या लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचे अतिरिक्त स्त्रोत निर्माण करण्यावर पालिकेने भर दिला आहे. मुंबईला ४४० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी गारगाई धरण प्रकल्प राबविण्यात येत आहे. गारगाई धरण प्रकल्प मे २०२९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून यासाठी पाच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

गावांच्या पुनर्वसनासाठीही वृक्षतोड

मुंबईची अतिरिक्त पाण्याची गरज भागविण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन केले तर सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकतो. मात्र गारगाई धरण प्रकल्प हाती घेऊन पर्यावरणाचा ऱ्हास करण्यात येणार आहे. प्रकल्पात तीन लाख झाडे बाधित होणार असल्याचे पालिला म्हणते. मात्र सहा गावांचे पुनर्वसन करताना आणखी दीड लाख झाडे बाधित होणार असल्याची माहिती पालिका प्रशासन लपवत आहे, असा आरोप पर्यावरण अभ्यासक स्टॅलिन डी. यांनी केला आहे.

प्रकल्पबाधितांना पालिकेत नोकरी

या प्रकल्पातील बाधित कुटुंबांना भूसंपादन कायद्यानुसार १० ते १२ लाख रुपये आणि कुटुंबातील एका व्यक्तीला मुंबई महापालिकेत नोकरी देण्यात येणार असल्याची माहिती अभिजीत बांगर यांनी दिली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मनमानी वेतन कपातीला लगाम; कामाचे तास, साप्ताहिक सुट्टीबाबत महाराष्ट्र वेतन नियम २०२६ लागू

Mumbai : वर्षभर रस्ते स्वच्छ ठेवा; VIP भेटीवेळीच देखावा नको; उच्च न्यायालयाने महापालिकेला सुनावले

बाळासाहेबांचा फोटो फाडल्यावरून वादंग; शायना यांनी सोनियांच्या पुस्तकातील फोटो फाडल्याने विरोधकांकडून टीकेची झोड

IND Vs NZ 1st Test: भारताची किवींविरुद्ध कसोटी; वेलिंग्टन येथे आजपासून पहिला सामना; बुमरा, पंतच्या पुनरागमनाकडे लक्ष

इटलीत घडतंय ते तुमच्यासोबतही घडेल?