Mumbai : झाले मोकळे फुटपाथ; घाटकोपरमध्ये पालिकेच्या एन विभागाची कारवाई संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : झाले मोकळे फुटपाथ; घाटकोपरमध्ये पालिकेच्या एन विभागाची कारवाई

पादचारी प्रथम अभियानांतर्गत मुंबई पालिकेच्या एन विभागाने घाटकोपर पूर्वेकडील अंकुश गावडे मार्गावरील फुटपाथवरील बेकायदा बांधकामे स्टॉल तसेच दुकाने जमीनदोस्त केली.

Swapnil S

मुंबई : पादचारी प्रथम अभियानांतर्गत मुंबई पालिकेच्या एन विभागाने घाटकोपर पूर्वेकडील अंकुश गावडे मार्गावरील फुटपाथवरील बेकायदा बांधकामे स्टॉल तसेच दुकाने जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे घाटकोपर मधील ६०० मीटर लांबचा परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात आला आहे.

आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार पादचारी प्रथम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत घाटकोपर पूर्व याठिकाणी फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले असून रेल्वे स्टेशन परिसरातील पादचाऱ्यांना आता अधिक सुरक्षित व सुलभ मार्ग उपलब्ध झाला आहे. रेल्वे स्थानक परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे फुटपाथ मोकळे झाल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि दिव्यांग नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई महापालिकेच्या परिमंडळ ५ च्या उपायुक्त संध्या नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एन विभागाचे सहायक आयुक्त जयदीप मोरे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण मुक्त फुटपाथ ही कारवाई करण्यात येत आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Monsoon Update : मान्सूनचा काढता पाय; राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू, हवामान खात्याची माहिती

लातूर बँकेच्या संचालकांना हटवण्याचे RBI चे आदेश

Mumbai : दादरमधील सीकेपी हॉलचा १२ ऑक्टोबरला लिलाव

पक्षचिन्हाच्या वादाबाबत ममता बॅनर्जी सर्वोच्च न्यायालयात

टॅरिफ विधेयकावर डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी