Mumbai : घाटकोपरच्या राहुल वरियाने रिक्षात बसवले बाप्पा; वडिलांच्या ४० वर्षांच्या सेवेला दिली अनोखी मानवंदना 
मुंबई

Mumbai : घाटकोपरच्या राहुल वरियाने रिक्षात बसवले बाप्पा; वडिलांच्या ४० वर्षांच्या सेवेला दिली अनोखी मानवंदना

दरवर्षी गणेशोत्सवात बाप्पाच्या आगमनासाठी विविध कलात्मक आणि आकर्षक संकल्पना पाहायला मिळतात.

Swapnil S

मुंबई : दरवर्षी गणेशोत्सवात बाप्पाच्या आगमनासाठी विविध कलात्मक आणि आकर्षक संकल्पना पाहायला मिळतात. यंदा मुंबईतील कलाकार राहुल वरिया याने 'मुंबईची रिक्षा आणि बाप्पाची स्वारी' या अत्यंत खास आणि भावूक संकल्पनेवर आधारित गणेशमूर्ती साकारली आहे. ऑटो-रिक्षात विराजमान झालेली ही इको-फ्रेंडली गणेशमूर्ती सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

राहुल वरिया याचे शाडूच्या मातीपासून स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती साकारण्याचे हे सलग १५ वे वर्ष आहे. पूर्णपणे पर्यावरणपूरक असलेल्या या ४ बाय ३ फूट आकाराच्या कलाकृतीत राहुलने अत्यंत सुबक आणि बारकाईने ऑटो-रिक्षा आणि त्यात विराजमान झालेले श्रीगणेश साकारले आहेत. राहुल प्रत्येक गणेशोत्सवात मुंबईचे प्रतिबिंब पडत असते.

कला, भक्तीचा सुंदर मेळ

पर्यावरणरक्षणाचा संदेश देत कौटुंबिक भावना जपणाऱ्या राहुलच्या या कलाकृतीचे घाटकोपर परिसरात आणि सोशल मीडियावर मोठे कौतुक होत आहे. बाप्पाच्या या अनोख्या 'रिक्षा प्रवासा'ने यंदाच्या गणेशोत्सवात एक वेगळाच उत्साह आणि आपुलकी निर्माण केली आहे. दरवर्षी विविध संकल्पना घेऊन राहुल गणेशोत्सवात कल्पकता आणत असून पारंपरिक सणाला आधुनिकतेची साथ देत आहे. त्याने लोकल डब्यात बसवलेला बाप्पाही चर्चेचा विषय झाला होता.

वडिलांच्या कष्टाला सलाम

ही संकल्पना केवळ एक कलाकृती नसून राहुलच्या कुटुंबाशी जोडलेली एक भावूक गोष्ट आहे. राहुलचे वडील गेल्या ४० वर्षांहून अधिक काळापासून घाटकोपरमध्ये प्रामाणिकपणे ऑटो-रिक्षा चालवत आहेत. आपल्या कुटुंबाचा आधार असलेल्या आणि वर्षानुवर्षे मुंबईकरांची सेवा करणाऱ्या वडिलांच्या या कष्टाला मानवंदना देण्यासाठीच राहुलने यंदा ही थीम निवडली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई; कॅफे मोंडेगर, महाराष्ट्र बिर्याणी सेंटरचे परवाने निलंबित

साखर कारखान्यांना ७३८ कोटींचे व्याज अनुदान; सहकारी साखर कारखान्यांसाठी सुलभ कर्ज योजना, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mumbai : शंख-शिंपल्यांपासून साकारली ९.५ फुटांची इको-फ्रेंडली गणेशमूर्ती; मालाडच्या श्री साई दर्शन मित्रमंडळाचे १७ व्या वर्षात पदार्पण

Pune : जल्लोषपूर्ण वातावरणात भाऊ रंगारी गणपती बाप्पा विराजमान; पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते विधिवत प्राणप्रतिष्ठापना

अधिष्ठाताच करणार पुनरावलोकन; कामकाजाच्या पुनरावलोकनासाठी वेगळी पद्धत, मुंबई महापालिकेचा नवा निर्णय