Mumbai : फेरीवाला निवडणूक मतमोजणी पूर्ण 
मुंबई

Mumbai : फेरीवाला निवडणूक मतमोजणी पूर्ण

मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नगर पथविक्रेत्यांची (फेरीवाला) मुख्य समिती आणि सात परिमंडळीय समिती निवडणुकीची मतमोजणी पालिका समिती सभागृह क्रमांक १ व २ येथे शनिवार व रविवारी शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नगर पथविक्रेत्यांची (फेरीवाला) मुख्य समिती आणि सात परिमंडळीय समिती निवडणुकीची मतमोजणी पालिका समिती सभागृह क्रमांक १ व २ येथे शनिवार व रविवारी शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली. या निवडणुकीत ४९.४६ टक्के मतदान झाले. नगर पथविक्रेत्यांची एक मुख्य समिती आणि सात परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे (सात समित्या) एकूण आठ समित्यांच्या सदस्य पदांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतमोजणी झाल्यानंतर निवडून आलेल्या सदस्यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. परंतु, मतमोजणीचा निकाल न्यायालयामध्ये सादर करण्यात येईल व न्यायिक प्रक्रियेनंतर निकाल सार्वजनिक करण्यात येणार आहे. 

शनिवार २८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यावेळी स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेल्या सर्व १३६ मतपेट्या बाहेर काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पालिकेच्या अनुज्ञापन विभागाच्या जवळपास २०० ते २५० कर्मचाऱ्यांच्या मदतीने शनिवारी दुपारी १२ वाजता उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतमोजणी सुरू केली. सर्वप्रथम मतपत्रिकांची आरक्षणनिहाय विभागणी करण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरूवात झाली. उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत अत्यंत पारदर्शकपणे सुरू असलेली मतमोजणी प्रक्रिया रविवारी सकाळी पूर्ण झाली. यावेळी उप आयुक्त (विशेष) विनायक विसपुते, अनुज्ञापन अधिक्षक अनिल काटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Mumbai : मालमत्ता करासाठी अखेरचे दोन दिवस; सुविधा केंद्र रात्री १२ पर्यंत सुरू राहणार

कोल्हापूर-नवी मुंबई इंडिगो विमानसेवा सुरू; दिवसातून दोन वेळा प्रवास करता येणार

मुंबईतील १५ तलाव होणार पुनरुज्जीवित; राज्य सरकारचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त, BMC सल्लागाराची नियुक्ती करणार

Navi Mumbai : पावसाळ्यासाठी सिडको प्रशासन सज्ज! १ जूनपासून २४ तास ‘आपत्कालीन नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित

Mira-Bhayandar Metro : प्रवाशांना मोठा दिलासा; मेट्रोचा पहिला टप्पा ३ एप्रिलपासून सुरू