फेरीवाल्यांच्या ओळखीची कसून पडताळणी करा; हायकोर्टाचे BMC, पोलिसांना सक्त निर्देश 
मुंबई

Mumbai : फेरीवाल्यांच्या ओळखीची कसून पडताळणी करा; हायकोर्टाचे BMC, पोलिसांना सक्त निर्देश

शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांच्या समस्येवर उच्च न्यायालयाने सोमवारी कठोर भूमिका घेतली. शहर आणि उपनगरांतील सर्व फेरीवाले आणि त्यांच्या मदतनीसांच्या ओळखीची कसून पडताळणी करा, असे सक्त निर्देश न्यायालयाने मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांना दिले.

Swapnil S

मुंबई : शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांच्या समस्येवर उच्च न्यायालयाने सोमवारी कठोर भूमिका घेतली. शहर आणि उपनगरांतील सर्व फेरीवाले आणि त्यांच्या मदतनीसांच्या ओळखीची कसून पडताळणी करा, असे सक्त निर्देश न्यायालयाने मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांना दिले. आपल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात हयगय केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरले जाईल, असा इशाराही न्यायालयाने यावेळी दिला.

न्यायालयाचे निरीक्षण

विविध याचिकाकर्ते सतत कायदेशीर मार्ग पत्करत आहेत. त्यामुळे ‘स्ट्रीट व्हेंडर्स ॲॅक्ट’ची अंमलबजावणी आजतागायत होऊ शकलेली नाही. ‘आझाद हॉकर्स’ खटल्यात निकाल दिल्यानंतरही या न्यायालयाने विविध प्रकरणांमध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि सर्व निर्देशांचे आजपर्यंत पालन झालेले नाही. ही वस्तुस्थिती रेकॉर्डवर उपलब्ध आहे. सदर आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यास आम्ही इच्छुक नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

RBI New Rules : आता एका क्लिकवर थांबवता येणार डिजिटल पेमेंट; 'स्टॉप स्विच'सह आरबीआयचे नवे नियम, वाचा सविस्तर

Mumbai : गुरुवारी, शुक्रवारी पाणीबाणी; धारावी, वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, भांडुपमध्ये पाणी नाही

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी; FIR दाखल, पोलिसांकडून तपास सुरू

Pune : साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध, लग्नालाही घरच्यांचा होकार; तरीही संशयावरून वाद, प्रियकराने आयटी इंजिनिअर प्रेयसीला संपवलं

नवरा वारंवार माहेरी पाठवायचा, संशय आल्याने बायकोने घरात लावले CCTV; फुटेज पाहून पायाखालची जमीनच सरकली