Mumbai : बसथांबा स्थलांतरावरून खडाजंगी; बेस्ट समिती अध्यक्ष-उबाठात बाचाबाची  
मुंबई

Mumbai : बसथांबा स्थलांतरावरून खडाजंगी; बेस्ट समिती अध्यक्ष-उबाठात बाचाबाची

गेटवे ऑफ इंडिया परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाच्या वतीने गेट वे ऑफ इंडिया परिसरात उभारण्यात आलेला बसथांबा स्थलांतरित करण्याची सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली होती.

Swapnil S

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाच्या वतीने गेट वे ऑफ इंडिया परिसरात उभारण्यात आलेला बसथांबा स्थलांतरित करण्याची सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली होती.

नार्वेकर यांच्या मागणीनुसार बसथांबा स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी बेस्ट समितीच्या पटलावर ठेवला. मात्र या प्रस्तावाला ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध करत प्रावासी व पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होईल, असा मुद्दा लावून धरला. या प्रस्तावावरून उबाठाचे नगरसेवक आणि समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.

गेट वे ऑफ इंडिया परिसरात नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. पर्यटकांसाठी बेस्ट उपक्रमाने बसमार्ग क्रमांक ए ११२ आणि ए ११६ हे अनुक्रमे अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट) ते गेट वे ऑफ इंडिया आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान संपूर्ण आठवडा प्रवर्तित होतात.

गेट वे ऑफ इंडिया येथून सागरी मार्गाने एलिफंटा, मांडवा, उरण व अलिबाग येथे जाणारे पर्यटक आणि स्थानिक रहिवासी यांच्यासाठी बसमार्ग क्रमांक ए ११२ आणि ए ११६ हे लास्ट माईल कनेक्टिव्हीट म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावतात. अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट) ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गेट वे ऑफ इंडिया दरम्यान सोमवार ते शनिवार प्रतिदिन सरासरी ४३६ बसफेऱ्यामंधून २४ हजार प्रवासी प्रवास करतात. हेच प्रमाण रविवार आणि सुट्टीच्या दिवशी वाढते व एकूण ५९८ बसफेऱ्यांमधून २८ हजार प्रवासी प्रवास करतात व सरासरी १ लाख ९८ हजार इतका महसूल उपक्रमास प्राप्त होतो. हे बसमार्ग प्रवाशांच्या सोयिचे आणि उपक्रमाच्या महसुलीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. मात्र गेट वे ऑफ इंडिया परिसरातील हा मार्ग बदलून तेथील बसथांबा छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयासमोरील योग्य ठिकाणी स्थलांतरीत करण्याची सूचना केली आहे.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके