मुंबईत उष्माघाताचा धोका; दुपारी ११ ते २ प्रकल्प कामे बंद ठेवा, नगरसेविकेचे महापालिका आयुक्तांना पत्र 
मुंबई

मुंबईत उष्माघाताचा धोका; दुपारी ११ ते २ प्रकल्प कामे बंद ठेवा, नगरसेविकेचे महापालिका आयुक्तांना पत्र

स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी सफाई कामगार अहोरात्र मेहनत करत असतात. परंतु सध्या प्रचंड उकाडा वाढला असून घराबाहेर पडणे जिकिरीचे झाले आहे.

Swapnil S

मुंबई : स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी सफाई कामगार अहोरात्र मेहनत करत असतात. परंतु सध्या प्रचंड उकाडा वाढला असून घराबाहेर पडणे जिकिरीचे झाले आहे. तरीही सफाई कामगार आपली जबाबदारी पार पाडत असतात. मुंबईच्या स्वच्छतेची काळजी घेणाऱ्या सफाई कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पालिका रुग्णालयात एसी कक्ष स्थापन करावा तसेच दुपारी ११ ते २ या कालावधीत प्रकल्पांची कामे बंद ठेवण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना लिहिल्याचे नगरसेविका प्रीती सातम यांनी सांगितले.

वाढत्या तापमानामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. उष्माघातामुळे आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी सफाई कामगार, कर्मचारी व प्रकल्प कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तातडीने उपाय कराव्यात, अशी मागणी सातम यांनी केली. तापमानाचा पारा ३६ ते ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने उन्हात काम करणाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्ते, बांधकामे आणि नागरी प्रकल्पांवर काम करणारे मजूर तसेच सफाई कर्मचारी यांना उष्माघात, निर्जलीकरण व अन्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो, असे नमूद केले आहे.

  • रुग्णालयातील कक्ष वातानुकूलित असावा आणि किमान दोन रुग्ण खाटा असाव्यात

  • स्वच्छता कर्मचाऱ्यांसह इतर प्रकल्प कामगार यांच्यासाठी ओआरएस पावडरचे वाटप करणे आणि पिण्याच्या पाण्याची योग्य प्रकारे व्यवस्था करावी

  • सार्वजनिक ठिकाणी कामधं‌द्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठी ओआरएस पावडर वाटप करणे आणि पाणपोईच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी

  • सिग्नल आणि बस थांबे याठिकाणी तात्पुरती निवारा शेड (सावली निर्माण करण्यासाठी हिरवा कपडा बांधणे)

  • या काळात दुपारी ११ ते २ या काळात खुल्या आकाशाखाली असणारे प्रकल्प कामे बंद ठेवावी

  • शाळा आणि मैदाने आदी ठिकाणे झाडे नसल्यास तात्पुरती निवारा शेड बांधणे

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : पॅकिंग खर्च वाढल्याने मसाल्यांचे दर वाढणार; अन्न व औषध प्रशासनाच्या निर्णयाचे पडसाद

नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना ४५ हजारांचे सानुग्रह अनुदान; महासभेची मंजुरी

जयशंकर, रुबिओ यांच्यात २० ऑक्टोबरला चर्चा होणार; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तनाचा आरोप; IAS अधिकाऱ्याच्या चौकशीचे जम्मू-काश्मीर सरकारचे आदेश

Mumbai : महसूल अधिकाऱ्यांना हायकोर्टाचा दणका; पुनर्विकास रखडल्याबद्दल ७ लाखांचा दंड