मुंबई

...तर 'दुसऱ्या' पत्नीलाही घरात नो एण्ट्री; दिवाळीच्या सुट्टीत घरात फक्त पुरुष आणि त्याची आईच राहणार - कोर्ट

घटस्फोट घेऊन विभक्त झालेल्या दाम्पत्याच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला. अंधेरीतील रहिवासी असलेल्या पुरुषाच्या विभक्त पत्नीच्या मनावर भावनिक आघात होता कामा नये म्हणून त्याच्या दुसऱ्या पत्नीला फ्लॅटमध्ये प्रवेश करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे.

Swapnil S

मुंबई : घटस्फोट घेऊन विभक्त झालेल्या दाम्पत्याच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला. अंधेरीतील रहिवासी असलेल्या पुरुषाच्या विभक्त पत्नीच्या मनावर भावनिक आघात होता कामा नये म्हणून त्याच्या दुसऱ्या पत्नीला फ्लॅटमध्ये प्रवेश करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. दिवाळीच्या सुट्टीत पुरुष व त्याच्या आईलाच सणाचा आनंद साजरा करता येईल, असा अंतरिम आदेश न्यायालयाने दिला.

विभक्त पत्नीने पतीची दुसरी पत्नी आणि मुलांना अंधेरी-पश्चिमेकडील फ्लॅटमध्ये राहू देण्यास तीव्र विरोध केला. दुसरी पत्नी आणि तिच्या मुलांसोबत दिवाळी साजरी करण्याच्या इच्छेतून पुरुषाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याच्या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. घटस्फोट घेतलेल्या दाम्पत्याचे मार्च १९९९ मध्ये लग्न झाले होते. त्यांना एक मुलगी आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये कौटुंबिक न्यायालयाने पतीचा अर्ज मान्य केला आणि क्रूरतेच्या कारणास्तव त्यांचा विवाह रद्द केला होता. त्याचवेळी त्यांचा फोर-बीएचके फ्लॅट वैवाहिक घर असल्याच्या कारणावरून तो फ्लॅट दोन समान भागांमध्ये विभागण्याचे निर्देश कौटुंबिक न्यायालयाने दिले होते. त्या आदेशाविरुद्ध दोघांनीही उच्च न्यायालयात अपील दाखल केले.

दोघांचेही अपिल सध्या प्रलंबित आहेत. त्यांच्या प्रलंबित अपीलांवर गुणवत्तेनुसार निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ लागेल. याचदरम्यान एप्रिल २०२४ मध्ये विभक्त पत्नीने गोंधळ घातला आणि मुलांसाठी बनवलेले अन्न फेकून दिले होते. या पार्श्वभूमीवर आणखी विसंवाद निर्माण होण्याच्या शक्यतेने खंडपीठाने याचिकाकर्त्या पुरुषाला दिवाळीच्या सुट्टीत केवळ त्याच्या आईसोबत अंधेरीतील फ्लॅटमध्ये राहण्याची परवानगी दिली.

याचिकाकर्त्याच्या दुसऱ्या पत्नीला आणि त्यांच्या मुलांना अंधेरीतील फ्लॅटमध्ये राहण्याची परवानगी दिली तर दोन्ही पक्षकारांमध्ये आणखी वाद निर्माण होईल, असे निरीक्षण न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने नोंदवले.

लक्ष्मीपूजनाला वरुणराजाचे 'फटाके'! दिवाळीच्या धामधुमीत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अवकाळी पावसाचे धुमशान

दिवाळीच्या सणात पावसाची आतषबाजी; शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

दिवाळीनिमित्त मोदींचे देशवासीयांना पत्र; स्वदेशी, भाषा, आरोग्य यासह ऑपरेशन सिंदूरचाही केला उल्लेख

राज ठाकरेंच्या दीपोत्सवावर सरकारची जाहिरातबाजी; मनसेची संतप्त पोस्ट, म्हणाले, "आमच्या पक्षाला...

MMR २०४७ पर्यंत बनणार अग्रगण्य शहरी अर्थव्यवस्था; MMRDA चा विश्वास