मुंबई उच्च न्यायालय संग्रहित छायाचित्र, पीटीआय
मुंबई

Mumbai : कुलाबाच्या रहिवाशांना दिलासा! कॉजवेवरील फेरीवाल्यांबाबत HC चे महापालिकेला महत्त्वाचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी कुलाबा कॉजवे येथील २५३ फेरीवाल्यांपैकी फक्त ८३ परवानाधारक फेरीवाले असल्याचे सांगितले. यानंतर कुलाबा येथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. उर्वरित १७० अनधिकृत फेरीवाल्यांना...

Swapnil S

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी कुलाबा कॉजवे येथील २५३ फेरीवाल्यांपैकी फक्त ८३ परवानाधारक फेरीवाले असल्याचे सांगितले. यानंतर कुलाबा येथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. उर्वरित १७० अनधिकृत फेरीवाल्यांना त्यांची बांधकामे, साहित्य आणि वस्तू ताबडतोब हटविण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जर त्यांनी पालन केले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत.

उच्च न्यायालयाने पुष्टी करत फक्त ८३ फेरीवाले परवानाधारक आहेत, तर उर्वरित बेकायदेशीर आहेत. हे स्टॉल नॉन-हॉकिंग झोनमधील फूटपाथवर उभारले आहेत. यामुळे पादचाऱ्यांच्या हालचालींवर मर्यादा येतात. वाहनांच्या वाहतुकीमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावर चालावे लागते, ज्यामुळे त्यांना जीव मुठीत घेवून चालावे लागले. हे स्टॉल पार्किंग क्षेत्रांमध्येही अडथळा निर्माण करतात, ज्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतो. हा निर्णय कुलाब्यातील रहिवाशांसाठी मोठा दिलासा आहे. असे मत माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी व्यक्त केले. तसेच बेकायदेशीर फेरीवाले त्यांची कायमस्वरूपी बांधकामे आणि वस्तू त्वरित काढून टाकतील. आणि पादचाऱ्यांना पदपथाचा वापर करता येईल. जर त्यांनी आदेशाचे पालन केले नाही तर,न्यायालयाच्या निर्देशांनुसार महापालिकेने ते काढून टाकण्यासाठी कारवाई करावी, असे नार्वेकर म्हणाले.

मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय राज्य सरकार आणि बीएमसीविरुद्ध कुलाबा कॉजवे टुरिझम हॉकर्स स्टॉल युनियनने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान आला.

Mumbai : शीव पूल १५ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार; अतिरिक्त पालिका आयुक्तांनी केली पाहणी

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा; अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी सुधारित योजना

ठाणे शहरात उभारले जाणार १९ ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स; प्रमुख चौकांमध्ये उपलब्ध होणार सुविधा; पीपीपी तत्त्वावर प्रकल्पाला मंजुरी

मीरा-भाईंंदर महापालिकेत भाजपचेच वर्चस्व; महापौरपद डिंपल मेहता, तर उपमहापौरपदासाठी ध्रुवकिशोर पाटील

Mira-Bhayandar : सोसायटीच्या ऑडिटसाठी मागितली लाज; सनदी लेखापाल ACB च्या जाळ्यात