मुंबई

Mumbai : नैराश्यग्रस्त व्यक्तीने हायकोर्ट परिसरात पेटवून घेतले|Video

एका नैराश्यग्रस्त व्यक्तीने सोमवारी दुपारी हायकोर्टाच्या परिसरात स्वत:ला पेटवून घेतले. दिवसाढवळ्या हायकोर्टासारख्या गबजलेल्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने उपस्थित वकील आणि लोकांची तारांबळ उडाली.

Swapnil S

मुंबई : एका नैराश्यग्रस्त व्यक्तीने सोमवारी दुपारी हायकोर्टाच्या परिसरात स्वत:ला पेटवून घेतले. दिवसाढवळ्या हायकोर्टासारख्या गबजलेल्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने उपस्थित वकील आणि लोकांची तारांबळ उडाली.

विरार येथील प्रकाश सावंत यांनी दुपारी दोनच्या सुमाराला एचएसबीसी बँकजवळील हायकोर्टाच्या गेट क्रमांक ४ समोर स्वतः च्या अंगावर ज्वालाग्रही पदार्थ ओतून स्वतःला पेटून घेतले. त्यामुळे एकच घबराट पसरली. पोलिसांनी त्यांना तातडीने जीटी रुग्णालयात दाखल केले. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

काय आहे पार्श्वभूमी

कणकवली येथील प्रकाश सावंत यांची काही जामीन नरडवे महमहवाडी प्रकल्पासाठी गेली. त्यात तहसीलदारांनी आपल्या इच्छेविरुद्ध हक्कसोड पत्र लिहून घेतले. या प्रकरणी सावंत यांनी एका महिला वकिलामार्फत न्यायालयात धाव घेतली. त्यासाठी वकील महिलेने ६ लाख ८० हजार घेतले. या विरोधात सावंत यांनी बार काऊंसिलकडे तक्रार करताच ६ लाख परत केले. मात्र ८० हजार देण्यास त्यांनी नकार दिला. या प्रकरणी सावंत यांनी तक्रार करूनही न्याय न मिळाल्याने सावंत यांनी टोकाचे पाऊल उचलले.

महाराष्ट्रात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचे; हवामान विभागाचा मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राला वादळी वाऱ्याचा इशारा

Mumbai : धावत्या लोकलसमोर बायकोला ढकलून दिले; मुलुंड स्थानकावर धक्कादायक प्रकार, आरोपी नवरा अटकेत

Mumbai : गुढीपाडव्याच्या भव्य शोभायात्रेसाठी गिरगाव सज्ज; पारंपरिक वेशभूषेत हजारो मुंबईकर सहभागी होणार

ठाण्यात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ; ४ लाखांचा ऐवज लुटला

“फोनवर बोलायचं असेल तर तुम्हीच नाटक करा!”; रंगमंचावर आस्ताद काळेचा संताप, चालू प्रयोग थांबवत प्रेक्षकाला सुनावलं