मुंबई : काही दिवसांवर वरुणराजाने आगमन येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या पावसाळ्यात ४.५० मीटर ते ४.८९ मीटर उंच लाटा उसळणार आहेत. १४ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान २४ दिवस समुद्रात मोठी भरती येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात समुद्रकिनारी, चौपाट्यांवर जाणे टाळावे, असे आवाहन पालिकेने मुंबईकरांना केले आहे.
पावसात सखल भागात पाणी साचते. त्यात यंदाच्या पावसाळ्यात समुद्रात तब्बल २४ दिवस उंच लाटा उसळणार आहेत. साडेचार मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार असल्याने समुद्रकिनारी, चौपाट्यांवर पर्यटकांनी जाणे टाळावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. १६ जुलै रोजी दुपारी १.३६ वाजता समुद्रात सर्वात जास्त ४.८९ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. मुंबई शहराचा आकार हा बशीसारखा खोलगट आहे. सांडपाणी, मलयुक्त पाणी हे ठिकठिकाणच्या पातमुखाच्या मार्फत समुद्रात सोडण्यात येते. मात्र पावसाळ्यात समुद्राला मोठी भरती असताना ही पातमुखे बंद करण्यात येतात. त्यामुळे शहरातील पाणी समुद्रात सोडण्याचा मार्ग बंद होतो, असे पालिकेने म्हटले आहे.
या महिन्यात समुद्र खवळणार; उंच लाटा उसळणार
जून महिना
१४ जून - सकाळी - ११.२४ वाजता - ४.६५ मीटर उंच
१५ जून दुपारी १२.१४ वाजता - ४.८० मीटर उंच
१६ जून - दुपारी - १.०५ वाजता - ४.८७ उंच लाटा
१७ जून - दुपारी - १.५५ वाजता - ४.८६ उंच लाटा
१७ जून - दुपारी - २.४४ वाजता - ४.७९ उंच लाटा
१९ जून - दुपारी ३.३२ वाजता - ४.६४ उंच लाटा
जुलै महिना
१३ जुलै - सकाळी - ११.१४ वाजता - ४.५३ उंच लाटा
१४ जुलै- दुपारी - १२.०४ वाजता - ४.७३ उंच लाटा
१५ जुलै - दुपारी - १२.५१ वाजता - ४.८५ उंच लाटा
१६ जुलै - दुपारी - १.३६ वाजता - ४.८९ उंच लाटा
१७ जुलै - दुपारी - २.१९ वाजता - ४.८३ उंच लाटा
ऑगस्ट महिना
१२ ऑगस्ट - दुपारी - ११.४८ वाजता - ४.६८ उंच लाटा
१३ ऑगस्ट - दुपारी - १२.२८ वाजता - ४.८१ उंच लाटा
१४ ऑगस्ट - दुपारी - १.७वाजता ४.८३ उंच लाटा
१५ ऑगस्ट - दुपारी - १.४४ वाजता - ४.७३ उंच लाटा
१६ ऑगस्ट - दुपारी - २.१९ वाजता - ४.५० उंच लाटा
सप्टेंबर महिना
१० सप्टेंबर - सकाळी -११.२६ वा. ४.५७ उंच लाटा
११ सप्टेंबर - दुपारी - १२.०० वाजता - ४.६५ उंच लाटा
१२ सप्टेंबर - दुपारी १२.३४ वाजता ४.६१ उंच लाटा -
१३ सप्टेंबर - दुपारी - ०१.०२ वाजता - ४.५१ उंच लाटा
२८ सप्टेंबर - मध्यरात्री ००.३८ वाजता - ४.५१ उंच लाटा
२९ सप्टेंबर - दुपारी ०१.१४ वाजता - ४.५९ उंच लाटा
३० सप्टेंबर - दुपारी - ०१.५३ वाजता - ४.५६ उंच लाटा