मुंबई

कौटुंबिक वादातून पत्नीवर फिनाईल फेकले; आरोपी पतीला नाशिक येथून अटक व कोठडी

हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीवर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी पतीला नाशिक येथून पोलिसांनी अटक केली.

Swapnil S

मुंबई : कौटुंबिक वादातून पत्नीवर पतीनेच फिनाईल फेकल्याची घटना मालवणी परिसरात घडली. हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीवर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी पतीला नाशिक येथून पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

पीडित महिला ही मालाडच्या मालवणी, मढची रहिवाशी आहे. २०१९ तिचे लग्न शब्बीरशी झाले होते. त्यावेळेस ते दोघेही नालासोपारा येथे राहत होते. शब्बीर हा ड्रग्जच्या आहारी गेल्याने काहीच कामधंदा करत नव्हता. त्यात त्याचे एका तृतीयपंथीशी अनैतिक संबंध निर्माण झाले होते. हा प्रकार समजल्यानंतर पती-पत्नीमध्ये सतत खटके उडू लागले होते. त्यातून तिने शब्बीरशी घटस्फोटाचा निर्णय घेत मढ येथील तिच्या घरी राहण्यासाठी आली होती. दोन दिवसांपूर्वी शब्बीर हा तिची समजूत काढण्यासाठी मढ येथे आला होता. यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि रागाच्या भरात त्याने तिच्या चेहर्‍यावर फिनाईल फेकले होते. त्यात तिच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तिला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या हल्ल्यानंतर शब्बीर हा पळून गेला होता. अटकेच्या भीतीने तो नाशिकला पळून गेला होता. ही माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी आरोपी शब्बीरविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला नाशिक येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी