Mumbai : अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर; दिल्लीच्या धर्तीवर वांद्रे, खार, सांताक्रूझमधील अमली पदार्थ तस्करांची बांधकामे पाडली 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर; दिल्लीच्या धर्तीवर वांद्रे, खार, सांताक्रूझमधील अमली पदार्थ तस्करांची बांधकामे पाडली

दिल्लीच्या धर्तीवर मुंबई पोलिसांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने वांद्रे, खार, सांताक्रूझ आणि अंधेरी पश्चिम परिसरातील अमली पदार्थ विक्रेत्यांशी कथित संबंध असलेल्या अनधिकृत बांधकामांवर शुक्रवारी धडक कारवाई केली.

Swapnil S

मुंबई : दिल्लीच्या धर्तीवर मुंबई पोलिसांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने वांद्रे, खार, सांताक्रूझ आणि अंधेरी पश्चिम परिसरातील अमली पदार्थ विक्रेत्यांशी कथित संबंध असलेल्या अनधिकृत बांधकामांवर शुक्रवारी धडक कारवाई केली.

यासंदर्भात पश्चिम प्रादेशिक विभाग दोनचे पोलीस उपायुक्त डॉ. मोहित कुमार यांनी सांगितले की, “अमली पदार्थ विक्रीविरोधातील मोहिमेचा भाग म्हणून आम्ही विक्रेत्यांशी संबंधित अनधिकृत आणि अतिक्रमण केलेल्या बांधकामांची ओळख पटवून ती कारवाईसाठी मुंबई महापालिकेच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर महापालिकेने संबंधित बांधकामे पाडली. अमली पदार्थांशी संबंधित कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. भविष्यातही अशा मोहिमा सुरू राहतील आणि अमली पदार्थ विक्रीत सहभागी असलेल्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

अलीकडेच वांद्रे पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने राहुल नगर झोपडपट्टी परिसरातील, रंगशारदा सभागृहाजवळ असलेली दोन अनधिकृत बांधकामे पाडली. ही बांधकामे हसन हैदर अली शेख आणि फातिमा अल्ताफ शेख या दोघांशी संबंधित असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. दोघेही किशोरवयीन आहेत. तसेच वांद्रे पश्चिम येथील एस. व्ही. रोडवरील जामा मशिदीजवळील मौलाना बाबा गल्ली परिसरात निलोफर हाफिज शेख आणि बडा शानू या टोपणनावाने ओळखला जाणारा शहनवाज नासिर कुरेशी यांच्याशी कथित संबंध असलेले आणखी एक बांधकाम पाडण्यात आले. खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेलिना हसमुख पटेल नावाच्या महिलेच्या निवासस्थानाजवळील अनधिकृत भिंत आणि पत्र्याचे शेड महापालिकेने हटवले. पोलिसांच्या माहितीनुसार, या महिलेविरोधात यापूर्वी एनडीपीएस कायद्यांतर्गत तीन गुन्हे आणि गांजाच्या कथित विक्रीशी संबंधित एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१४ ऑक्टोबर रोजी अंधेरी पश्चिम येथील डी. एन. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशीच कारवाई करण्यात आली. अमली पदार्थ विक्रीच्या आरोपाखाली असलेल्या ३५ वर्षीय आसिफ इक्बाल खान ऊर्फ चुहा याने उभारल्याचा आरोप असलेले पत्रे आणि ताडपत्रीचे अनधिकृत शेड पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने हटवले. यासंदर्भात पोलिसांनी महापालिकेशी पत्रव्यवहार केला होता.

खान याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १११ अंतर्गत तसेच एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(अ), २२(ब) आणि २९ अंतर्गत गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तरतुदी अनुक्रमे संबंधित गुन्हेगारी कृत्ये, अमली पदार्थांचे बेकायदेशीर उत्पादन, ताबा, विक्री व वाहतूक तसेच गुन्हेगारी कटाशी संबंधित आहेत. बांधकाम पाडण्याच्या दोन दिवस आधीच खान याची जामिनावर सुटका झाली होती. त्याने पुन्हा अमली पदार्थ विक्री सुरू करू नये, हा या कारवाईमागील उद्देश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ऑगस्टमध्ये सांताक्रूझ पोलिसांनीही अशाच प्रकारची कारवाई केली होती. सांताक्रूझ पश्चिम येथील राजेश खन्ना उद्यानाजवळील मुरुगन चाळीत राहणाऱ्या ५० वर्षीय अंबिका हरजन आणि २७ वर्षीय दुर्गा पांडे यांनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली होती. या दोघींकडून १७ ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली असून तिची किंमत सुमारे २.५५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

‘रेटकार्ड’ बंधनकारक; खासगी रुग्णालयांत दर्शनी भागांत दरपत्रक लावणे आवश्यक, नियमभंग करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई

Mumbai : हॉटेलचे खाणे महागणार; सर्व पदार्थांच्या दरात १० ते १५ टक्के होणार वाढ, ‘आहार’ संघटनेचा निर्णय

‘जंतरमंतर’ ते ‘आयफेल टॉवर’!

आजचे राशिभविष्य, १७ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Navratri 2026 : उपवासासाठी बनवा राजगिऱ्याचे पराठे; जाणून घ्या सोपी रेसिपी