Mumbai : जे. जे. उड्डाणपुलाखाली डबलडेकर बस धूळखात! कलादालन, कॅफेटेरिया, वाचनालय कागदावरच; महिला बचत गटांची पाठ 
मुंबई

Mumbai : जे. जे. उड्डाणपुलाखाली डबलडेकर बस धूळखात! कलादालन, कॅफेटेरिया, वाचनालय कागदावरच; महिला बचत गटांची पाठ

मुंबईकर व पर्यटकांना जुन्या डबलडेकर बसमधून कलादालन, कॅफेटेरिया आणि वाचनालयाचा अनोखा अनुभव देण्याची मुंबई पालिकेची महत्त्वाकांक्षी योजना कागदावरच राहिली आहे. जे. जे. उड्डाणपुलाखाली उभ्या केलेल्या तीन नॉन-एसी डबलडेकर बसेस गेल्या अनेक महिन्यांपासून धूळखात पडल्या आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबईकर व पर्यटकांना जुन्या डबलडेकर बसमधून कलादालन, कॅफेटेरिया आणि वाचनालयाचा अनोखा अनुभव देण्याची मुंबई पालिकेची महत्त्वाकांक्षी योजना कागदावरच राहिली आहे. जे. जे. उड्डाणपुलाखाली उभ्या केलेल्या तीन नॉन-एसी डबलडेकर बसेस गेल्या अनेक महिन्यांपासून धूळखात पडल्या आहेत.

बसच्या तुटलेल्या काचा, उडालेला रंग, अस्वच्छता आणि आजूबाजूला साचलेला कचरा यामुळे या उपक्रमाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या बसमधील सुविधा चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या महिला बचत गटांनीही पाठ फिरवल्याने महापालिकेच्या बी वॉर्डाने आता पुन्हा एकदा स्वारस्य अभिरुची मागवली आहे.

कालबाह्य झालेल्या बेस्टच्या डबलडेकर बसचा कल्पक वापर करून त्यांना कलादालन, कॅफेटेरिया आणि वाचनालयाचे स्वरूप देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता.

या उपक्रमासाठी २३ डिसेंबर २०२३ रोजी निविदा काढण्यात आली होती. प्रत्येक बसमधील स्वतंत्र सुविधा चालवण्यासाठी एका महिला बचत गटाची नियुक्तीही करण्यात आली. मात्र, नियुक्तीनंतरही बचत गटांनी प्रत्यक्ष काम सुरू केले नाही. महापालिकेकडून स्मरणपत्रे पाठवूनही प्रतिसाद मिळाला नसल्याने अखेर हा प्रकल्प रखडला.

दरम्यान, बसच्या बाह्यभागावर धूळ साचली असून रंग उडाला आहे. बसच्या खाली कचरा टाकण्यात आला आहे. काही ठिकाणी काचा फोडण्यात आल्याचेही दिसते. बसच्या बाहेरील भागावर थुंकल्याच्या खुणा असून परिसरात भिकारी आणि नशा करणाऱ्या व्यक्तींचा वावर असल्याचे स्थानिक पातळीवरील चित्र आहे.

जे. जे. उड्डाणपुलाखाली डबलडेकर बस धूळखात! कलादालन, कॅफेटेरिया, वाचनालय कागदावरच; महिला बचत गटांची पाठ

पुन्हा निविदा, तरीही प्रश्न कायम

महिला बचत गटांनी प्रतिसाद न दिल्याने बी. वॉर्डने या सुविधा सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा स्वारस्य अभिरूची मागवली आहे. मात्र, यावेळीही प्रतिसाद मिळाला नाही, तर हा उपक्रम बंद करायचा की पुढे सुरू ठेवायचा, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

जलसंपदा विभागात ३९,७२२ पदभरती; आकृतीबंध मंजूर; वाढीव ११० सिंचन शाखा, भूसंपादन, कृषी, सिंचन सहाय्यकाचे नवे पद

मुंबई, कोकणातील शिक्षकांना मोठा दिलासा; सोमवार ते शुक्रवार केवळ अध्यापनाचे काम, माहिती संकलनासाठी शनिवार निश्चित

मुंबई, ठाणे, भिवंडीकरांनो पुढील ७ दिवस पाणी उकळून प्या; BMC चे आवाहन

Mumbai : पालिका अभियंत्यांच्या ऑनलाइन बदल्यांचा उतारा! महिनाभरात बदलीच्या ठिकाणी रूजू व्हा

शेतकऱ्यांच्या मदतीसाठीही निकष; ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीची अट ठरणार जाचक