Mumbai : शस्त्रक्रियांचा दर्जा, अचूकता, सुरक्षितता वाढणार; KEM रुग्णालयात प्रगत ‘व्हेसल सीलर’ तंत्रज्ञान  (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mumbai : शस्त्रक्रियांचा दर्जा, अचूकता, सुरक्षितता वाढणार; KEM रुग्णालयात प्रगत ‘व्हेसल सीलर’ तंत्रज्ञान

महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांना मोठा दिलासा देत केईएम रुग्णालय आणि सेठ जी. एस. मेडिकल कॉलेजमध्ये प्रगत ‘हाय-एंड व्हेसल सीलर’ उपकरण बसवण्यात आले आहे.

अमित श्रीवास्तव

अमित श्रीवास्तव/मुंबई

महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांना मोठा दिलासा देत केईएम रुग्णालय आणि सेठ जी. एस. मेडिकल कॉलेजमध्ये प्रगत ‘हाय-एंड व्हेसल सीलर’ उपकरण बसवण्यात आले आहे. यामुळे हजारो रुग्णांच्या शस्त्रक्रियांचा दर्जा, अचूकता आणि सुरक्षितता लक्षणीयरीत्या वाढणार आहे.

राज्य आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘या उपक्रमाचा उद्देश सार्वजनिक आरोग्य सेवा मजबूत करणे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आधुनिक वैद्यकीय उपचारांची उपलब्धता सुनिश्चित करणे हा आहे.’ कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमाचा एक भाग म्हणून जनरल सर्जरी विभागासाठी जमशेदजी मेहता सर्जिकल कॉम्प्लेक्समधील ‘इलेक्टिव्ह सर्जरी ऑपरेशन थिएटर’मध्ये दोन अत्याधुनिक इलेक्ट्रोसर्जिकल युनिट्स बसवण्यात आले आहेत. दरम्यान, या उपक्रमाला पाठिंबा दिल्याबद्दल आणि महाराष्ट्राची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहे.

गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमध्ये उपयोगी

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हे तंत्रज्ञान विशेषतः गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमध्ये अत्यंत फायदेशीर ठरेल. यामुळे डॉक्टरांना शस्त्रक्रियेतील धोके कमी करून अधिक कार्यक्षमतेने आणि अचूकतेने काम करता येईल.

शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण वाढणार

मुंबईतील सर्वात मोठ्या सार्वजनिक आरोग्य संस्थांपैकी एक असलेल्या केईएम रुग्णालयात दररोज हजारो गरीब आणि गरजू रुग्णांवर उपचार केले जातात. नव्याने सुरू झालेल्या व्हेसल सीलर तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्त्राव अधिक प्रभावीपणे नियंत्रित करणे शक्य होणार असून यामुळे शस्त्रक्रियांचे परिणाम लक्षणीयरीत्या सुधारण्याची अपेक्षा आहे. हे उपकरण रक्तवाहिन्या त्वरित सील करते ज्यामुळे रक्ताचा अपव्यय कमी होतो, गुंतागुंतीचा धोका टळतो आणि रुग्णांची सुरक्षितता वाढते.

रक्तस्त्राव कमी होणार

हाय-एंड व्हेसल सीलर हे एक प्रगत शस्त्रक्रिया उपकरण आहे, जे नियंत्रित विद्युत ऊर्जा आणि दाबाचा वापर करून रक्तवाहिन्या तसेच ऊती जलद आणि सुरक्षितपणे सील करते. यामुळे डॉक्टरांना शस्त्रक्रियेदरम्यान होणारा रक्तस्त्राव कमी करण्यास मदत होते.

ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

सायबर भामट्यांनी खाते रिकामे केले? घाबरू नका; पैसे परत मिळवण्यासाठी अशी करा तक्रार

व्हिडीओ एडिटिंग येत नाही? फक्त काही टॅप्समध्ये साधा व्हिडीओ होईल सिनेमॅटिक; Google Photos चं नवं एआय फीचर लॉन्च

Palghar Landslide : तांदुळवाडी किल्ल्याजवळ दरड कोसळली; पर्यटकांसाठी प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Mumbai : 'मराठीत बोला' म्हणणाऱ्या प्रवाशाला दोन तास RPF कार्यालयात बसवून ठेवले; व्हायरल VIDEO ची रेल्वेकडून चौकशी