मुंबई

आर्थिक गुन्ह्यांमध्ये मुंबई आघाडीवर; NCRB अहवालातील निरीक्षण; मेट्रो शहरांमध्ये सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद आर्थिक राजधानीत

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने २०२३ मध्ये एकूण ६,४७६ प्रकरणांसह मेट्रो शहरांमध्ये आर्थिक गुन्ह्यांच्या बाबतीत आघाडी घेतली आहे, अशी माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालातून समोर आली आहे.

Swapnil S

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने २०२३ मध्ये एकूण ६,४७६ प्रकरणांसह मेट्रो शहरांमध्ये आर्थिक गुन्ह्यांच्या बाबतीत आघाडी घेतली आहे, अशी माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालातून समोर आली आहे. तथापि, २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये मुंबईत आर्थिक गुन्ह्यांच्या संख्येत घट झाली आहे.

महाराष्ट्रामध्ये आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढताना दिसते आहे. २०२१ मध्ये १५,५५०, २०२२ मध्ये १८,७२९ आणि २०२३ मध्ये ही संख्या वाढून १९,८०३ वर पोहोचली, असे एनसीआरबी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

राजस्थान २७,६७५ प्रकरणांसह देशात पहिल्या क्रमांकावर आहे, तर तेलंगणा दुसऱ्या क्रमांकावर असून तेथे २६,३२१ प्रकरणांची नोंद झाली आहे. महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे.

महाराष्ट्रातील एकूण आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांपैकी ५४.९ टक्के प्रकरणांमध्ये पोलिसांनी आरोपपत्र दाखल केली आहेत, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.

सायबर क्राईमबाबत बोलायचे झाल्यास, महाराष्ट्रात २०२३ मध्ये ८,१०३ प्रकरणे नोंदवली गेली आणि तो चौथ्या क्रमांकावर राहिला. कर्नाटकने २१,८८९ सायबर गुन्ह्यांसह देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. मेट्रो शहरांतील सायबर क्राईमप्रकरणी, मुंबईत ४,१३१ प्रकरणांची नोंद झाली असून ती तिसऱ्या स्थानावर आहे.

बेंगळुरूने १७,६३१ प्रकरणांसह पहिला क्रमांक पटकावला असून, हैदराबाद ४,८५५ प्रकरणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणांपैकी ३७.९ टक्के प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल.

SRA चा कॉर्पस फंड १ लाख! झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचा प्रस्ताव; इमारतींच्या उंचीप्रमाणे रकमेत होणार वाढ

डायग्नोस्टिक लॅब्ससाठी नवीन कायदा; चाचण्यांची अचूकता व विश्वासार्हता राखण्यासाठी सरकारचे पाऊल

...तर ओला, उबरवर कारवाई

‘सावरकर सदन’ला वारसा स्थळाचा दर्जा; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

एलॉन मस्क यांची संपत्ती ५०० अब्ज डॉलरवर; जगातील पहिलेच उद्योगपती ठरले