मुंबईच्या बाजारात लिंबाची आवक घटली; एक लिंबू १० ते १२ रुपयांना  छायाचित्र: फारूक सय्यद
मुंबई

मुंबईच्या बाजारात लिंबाची आवक घटली; एक लिंबू १० ते १२ रुपयांना

ऑक्टोबर हिटच्या झळा दिवसेंदिवस वाढू लागल्याने मुंबईकर घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. यातच मुंबईतील बाजारपेठेत लिंबांची आवक घटल्याने लिंबाचे दर चांगलेच वधारले आहेत. मुंबईच्या किरकोळ बाजारात एका लिंबासाठी १० ते १२ रुपये मोजावे लागत आहेत.

Swapnil S

मुंबई : ऑक्टोबर हिटच्या झळा दिवसेंदिवस वाढू लागल्याने मुंबईकर घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. यातच मुंबईतील बाजारपेठेत लिंबांची आवक घटल्याने लिंबाचे दर चांगलेच वधारले आहेत. मुंबईच्या किरकोळ बाजारात एका लिंबासाठी १० ते १२ रुपये मोजावे लागत आहेत.

राज्यात लिंबूचे उत्पादन घटल्याने मुंबईतील विविध बाजारपेठेत लिंबाचे दर चांगलेच भडकले आहेत. दादरमधील लिंबू बाजारात ५०० ते ६०० लिंबू असलेल्या एका क्रेट किंमत ६ हजार रुपयांवर पोचली आहे. त्यामुळे बाजारात एक लिंबू १० ते १२ रुपयांना मिळू लागला आहे.

यातच ऑक्टोबर हिटमुळे उकाडा वाढल्याने लिंबाला मागणी वाढली आहे. तर बाजारातील पुरवठा अपेक्षेप्रमाणे नसल्याने लिंबाचे दर वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. घरी लिंबाचा वापर करणाऱ्या ग्राहकांसोबतच ज्यूस सेंटर, हॉटेल आणि खानावळ चालकांनाही या दरवाढीचा फटका बसत आहे.

दादरमधील लिंबू बाजारात दौंड येथील बेलवंडी, मद्रास आणि हैद्राबाद येथून लिंबू विक्रीस येतात. बाजारात लिंबूची आवक घटल्याने लिंबूचे भाव वाढले होते.

लिंबाच्या एका क्रेटची किंमत ६ हजार रुपयांच्यावर गेली होती. आज बाजारात हैदराबादहून लिंबाची आवक वाढल्याने काही प्रमाणात लिंबाच्या किंमती हजार दोन हजार रुपयांनी कमी झाल्या आहेत.

यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असल्याचे लिंबू विक्रेते प्रशांत चंदनशिवे यांनी सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

झुरळांचे आज 'चलो शिवाजी पार्क'; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP चे देशव्यापी आंदोलन; शहांनी केलेली चूक फडणवीसांनी टाळावी - दीपके

सर्वोच्च न्यायालयाचा वाहनचालकांना इशारा; थकीत दंडवसुलीची गंभीर दखल; राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कठोर कारवाईचे आदेश

पिकनिकसाठी आलेल्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; दिवेआगर समुद्रात आळंदीच्या विनर्स अकादमीच्या सहलीची शोकांतिका

मध्य रेल्वेचा कसारा येथे १२ दिवस विशेष ब्लॉक; तिसऱ्या मार्गाच्या कामामुळे उपनगरीय, मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम

No UPI Day : एमडीआर शुल्काला विरोध वाढला; आज 'नो युपीआय डे'? दोन प्रमुख संघटनांकडून परस्परविरोधी भूमिका