ANI
मुंबई

Mumbai Local: असा असेल रविवारी मेगाब्लॉक...

माटुंगा-मुलुंड दरम्यान ब्लॉक (Mumbai Local) दरम्यान मेन लाईनवरील सेवा धीम्या मार्गावर वळवल्या जातील; हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

प्रतिनिधी

उपनगरी रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वे १३ नोव्हेंबर, रविवारी मेगा ब्लॉक घेणार आहे. मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक हे माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन फास्ट लाईन सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत असेल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते ३.३५ पर्यंत डाऊन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान वळवल्या जातील.

हार्बर मार्गावर पनवेल- वाशी अप आणि डाऊन सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत पनवेल/ बेलापूरकडे जाण्याऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ब्लॉक कालावधीत विशेष रेल्वे सेवा उपलब्ध राहतील. बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध असेल. स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. पश्चिम रेल्वे मार्गावर वसई रोड ते वैतरणा अप - डाऊन शनिवारी रात्री ११.५० ते रविवारी पहाटे २.५० वाजेपर्यंत असेल. तसेच नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने धावतील.

अतिवृष्टीमुळे आर्थिक संकट अधिक गडद

आजचे राशिभविष्य, २५ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय