ऐन दिवाळीत मुंबईकरांचा लोकल प्रवास रखडणार! मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर मार्गावरील लोकल रद्द, वाचा महत्त्वाचे अपडेट्स संग्रहित छायाचित्र
मुंबई

ऐन दिवाळीत मुंबईकरांचा लोकल प्रवास रखडणार! मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर मार्गावरील लोकल रद्द, वाचा महत्त्वाचे अपडेट्स

Mumbai Local Mega Block : हार्बर मार्गावरील मेगाब्लॉकचा परिणाम ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतुकीवरही होणार आहे. या कालावधीत ठाणे ते वाशी आणि ठाणे ते नेरूळदरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा सुरू राहतील. मात्र...

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : दिवाळीच्या सणासाठी खरेदी, नातेवाईकांच्या भेटीगाठी किंवा इतर कामांसाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना उद्या लोकल प्रवासात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मध्य रेल्वेने रविवारी (दि. ८) मुख्य आणि हार्बर मार्गावर देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. माटुंगा ते मुलुंड आणि पनवेल ते वाशी या स्थानकांदरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गांवरील लोकल सेवांच्या वेळापत्रकात बदल होणार असून काही लोकल रद्द राहणार आहेत. दुसरीकडे, पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक नसल्याने तेथील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंडदरम्यान मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

या कालावधीत सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन धीम्या लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर ठाण्याहून सुटणाऱ्या अप धीम्या लोकल मुलुंड स्थानकात अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील लोकल सेवांना विलंब होण्याची शक्यता आहे.

हार्बर मार्गावरील लोकल सेवांवर परिणाम

हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ या वेळेत मेगाब्लॉक असेल.

या ब्लॉकदरम्यान पनवेलहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द राहतील. तसेच सीएसएमटीहून पनवेल आणि बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकलही धावणार नाहीत.

ट्रान्सहार्बर मार्गावर मर्यादित लोकल सेवा

हार्बर मार्गावरील मेगाब्लॉकचा परिणाम ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतुकीवरही होणार आहे. या कालावधीत ठाणे ते वाशी आणि ठाणे ते नेरूळदरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा सुरू राहतील. मात्र, इतर प्रभावित मार्गांवरील सेवा रद्द किंवा बदललेल्या वेळापत्रकानुसार चालवण्यात येतील. त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी लोकलचे वेळापत्रक तपासावे.

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक असला तरी पश्चिम रेल्वेने रविवारी कोणताही मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल सेवा नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत. सणाच्या दिवशी प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता पश्चिम रेल्वेवरील हा निर्णय प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maharashtra Board Exam 2027 : दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर! कोणता पेपर कधी? जाणून घ्या एका क्लिकवर

बिश्नोई टोळीला मोठा धक्का! जवळचा साथीदार हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत; रोहित शेट्टी, रणवीर सिंहला धमकी दिल्याचा आरोप

सरकारी कर्मचाऱ्यांची सक्तीची निवृत्ती म्हणजे शिक्षा नव्हे - सर्वोच्च न्यायालय

Mumbai : बेस्ट बसमध्ये आता सुट्ट्या पैशांची कटकट संपणार? QR कोड स्कॅन करून तिकीट काढण्याचा प्रस्ताव

Thane : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वर्ग करण्याची याचिका फेटाळली