संग्रहित छायाचित्र 
मुंबई

Mumbai Local Mega Block: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांत विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येतील.

Swapnil S

मुंबई : अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घेतला आहे. मुख्य मार्गावर ठाणे आणि कल्याण दरम्यान शनिवारी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ४.३० पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल. तर अप आणि डाऊन हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी दरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लॉक घेण्यात आला येणार आहे.

ठाणे आणि कल्याण दरम्यान मध्यरात्री (शनिवार/रविवार) १२.३० ते पहाटे ४.३० पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - येथून रात्री ११.३०, ११.५१, १२.०२ आणि १२.१२ वाजता सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत.

कल्याण येथून पहाटे ३.२३ आणि ३.५७ वाजता सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि ठाकुर्ली व कोपर स्थानकांवर थांबणार नाहीत आणि पुढे मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.

अप आणि डाऊन हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी दरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत पनवेल / बेलापूर / वाशीसाठी जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत विशेष उपनगरीय गाड्या

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांत विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येतील.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी