मुंबई

धक्कादायक! मुंबई लोकलमध्ये वृद्धाला हत्या; हत्येचं कारण आले समोर

गुरुवारी २ मार्चला धावत्या लोकलमध्ये एक वृद्ध सामान कक्षाच्या बोगीत चढला असता त्याला मारहाण झाल्याची घटना घडली

प्रतिनिधी

काल कल्याण ते टिटवाळा यादरम्यान धावत्या मुंबई लोकलमध्ये सामान कक्षाच्या बोगीत एका व्यक्तीला मारहाण झाली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. ही व्यक्त वृद्ध असून बबन हांडे देशमुख असे त्यांचे नाव होते. गुरुवारी २ मार्चला दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी संबंधित एका संशयिताला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बबन हांडे देशमुख हे सेवानिवृत्त कर्मचारी असून आंबिवली येथे राहत होते. दुपारी हांडे काही कामानिमित्त कल्याण येथे आले होते. त्यानंतर काम संपवून आपल्या घरी जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकातून टिटवाळ्याकडे जाणारी गाडी पकडली. यावेळी ते लोकलच्या सामान कक्षाच्या डब्ब्यात चढले होते. त्यावेळी काही व्यक्तींसाबोत गाडीत चढण्यावरुन किंवा बसण्यावरुन वाद झाला. त्यांना जबर मारहाण करण्यात आली. यातच त्यांचा मृत्यू झाला. टिटवाळा रेल्वे स्थानकात ही लोकल पोहचल्यानंतर त्यांचा मृतदेह त्या डब्ब्यात सापडला. या घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक