मुंबई

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईच्या लोकल ट्रेन्सची खास 'हॉर्न सलामी'; रात्री १२ चा ठोका वाजताच CSMT वर जल्लोष; Video व्हायरल

भारतासह जगभरात सरत्या वर्षाला निरोप देताना नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मुंबईकरांनी मरीन ड्राइव्ह, गेटवे ऑफ इंडियासारख्या ठिकाणांसह विविध चौपाट्यांवर एकच जल्लोष केला. अनेक ठिकाणी फाटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मुंबईची लाईफलाइन असलेल्या 'लोकल ट्रेन'नेही अनोख्या अंदाजात नववर्षाचं स्वागत केलं. रात्री १२ वाजताचा ठोका पडताच...

Mayuri Gawade

भारतासह जगभरात सरत्या वर्षाला निरोप देताना नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मुंबईकरांनी मरीन ड्राइव्ह, गेटवे ऑफ इंडियासारख्या ठिकाणांसह विविध चौपाट्यांवर एकच जल्लोष केला. अनेक ठिकाणी फाटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मुंबईची लाईफलाइन असलेल्या 'लोकल ट्रेन'नेही अनोख्या अंदाजात नववर्षाचं स्वागत केलं. रात्री १२ वाजताचा ठोका पडताच मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाच्या विविध फलाटांवर उभ्या सर्वच लोकलचा एकाचवेळी हॉर्न वाजवण्यात आला, जणू नववर्षाला हॉर्नद्वारे खास सलामी देण्यात आली. या क्षणाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो, सीएसएमटी स्थानकावरील विविध प्लॅटफॉर्मवर लोकल गाड्या उभ्या आहेत. घड्याळात रात्रीचे १२ वाजताच मोटरमन्सनी एकाच वेळी हॉर्न वाजवले. एकसुरात घुमणाऱ्या या आवाजाने संपूर्ण स्थानक दुमदुमून गेलं. उपस्थित प्रवाशांनी जोरदार जल्लोष करत ‘हॅपी न्यू इयर’च्या शुभेच्छाही दिल्या सोबतच अनेकांनी हा क्षण मोबाईलमध्ये टिपला. मुंबईकरांसाठी हा 'हॉर्न सलाम' आता वार्षिक परंपरा बनली असून, शहराची लाइफलाईन असलेल्या लोकल ट्रेनच्या साक्षीने नववर्षात प्रवेश करण्याचं प्रतीक ठरत आहे.

शहरभर नववर्षाचा जल्लोष

रेल्वे स्थानकांपलीकडेही मुंबईतील प्रमुख ठिकाणी उत्सवाची धूम दिसून आली. २०२६ ची सुरुवात होताच मरीन ड्राइव्ह, गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी आणि वांद्रे बँडस्टँड येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली. शहराच्या नाईटलाइफमुळे उशिरापर्यंत उत्सव रंगला, तर मुंबईच्या झगमगत्या स्कायलाईनने जल्लोषात भर घातली.

चौपाट्यांपासून रेल्वे स्थानकांपर्यंत उत्साह

बुधवार संध्याकाळपासूनच जुहू चौपाटीवर नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांची गर्दी वाढू लागली होती. चर्चगेट, वांद्रे आणि सीएसएमटीसारख्या प्रमुख रेल्वे स्थानकांवरही उत्सवी वातावरण अनुभवायला मिळालं. या निमित्ताने बीएमसी मुख्यालय आणि सीएसएमटीसह अनेक महत्त्वाच्या इमारती प्रकाशझोतात न्हाऊन निघाल्या.

कडेकोट सुरक्षा व्यवस्था

मोठ्या गर्दीचा विचार करून सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली होती. मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू बीच आणि वर्सोवा बीचसह प्रमुख ठिकाणी सुमारे १७,००० पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी तैनात होते. प्रशासनाने सतत देखरेख करून गर्दी व्यवस्थापन आणि वाहतूक सुरळीत ठेवली.

४० ठार, १०० जखमी; नववर्षाच्या पार्टीदरम्यानच बारमध्ये भीषण स्फोट; स्वित्झर्लंडच्या आलिशान 'स्की रिसॉर्ट'मध्ये मोठी दुर्घटना

प्रवाशांनो लक्ष द्या! UTS ॲपमधून ट्रेन पास बुकिंग बंद; आता RailOne वापरा; मिळेल ३ टक्के डिस्काउंटही, वाचा सविस्तर

एबी फॉर्म गिळला की फाडला? पुण्यातील शिंदेसेनेच्या उमेदवाराने स्वतः केला खुलासा, म्हणाले - "भावनेच्या भरात माझ्याकडून...

ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; उद्या १२ तास पाणीपुरवठा बंद

नवी मुंबईतील मतदार करणार ३ ते ४ वेळा मतदान; बहुसदस्यीय पद्धतीने प्रथमच निवडणूक; व्यापक जनजागृतीची गरज