मुंबई

'बाई.. हा काय प्रकार?' कच्च्या आल्यावर सॉस अन् चहात केळी; लोकलमधील व्लॉगरच्या अजब खाद्यप्रयोगाने प्रवासी अवाक | Video

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये घडणारे अनोखे आणि गंमतीशीर प्रसंग नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत येतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय ज्यामध्ये व्लॉगर चक्क कच्चं आलं हातात घेतो, त्यावर भरपूर सॉस घालतो आणि अजिबात संकोच न करता ते खातो...

Mayuri Gawade

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये घडणारे अनोखे आणि गंमतीशीर प्रसंग नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत येतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून, एका तरुणाने केलेल्या अजब ‘प्रँक’मुळे प्रवासी अक्षरशः गोंधळून गेले आहेत.

व्लॉगरच्या विचित्र खाद्य सवयींमुळे प्रवासी अवाक

हा व्हिडीओ कंटेंट क्रिएटर आणि व्लॉगर प्रणय जोशी याचा आहे. लोकल ट्रेनमध्ये सहप्रवाशांसोबत बसून तो अत्यंत विचित्र खाद्यपदार्थ खात असल्याचं या व्हिडीओत दिसतं. सुरुवातीला तो कच्चं आलं हातात घेतो, त्यावर भरपूर सॉस घालतो आणि अजिबात संकोच न करता ते खातो. शेजारी बसलेले दोन वृद्ध प्रवासी हे दृश्य पाहून अवाक् होतात. इतकंच नाही, तर तो “वाह!” असं म्हणत त्या चवीचा आनंद घेत असल्याचंही दाखवतो.

गरम चहात केळं... अजब कॉम्बिनेशन

यानंतर हा प्रँक आणखी पुढे जातो. तो दुसऱ्या प्रवाशांसोबत बसून चक्क गरम चहात केळं बुडवून खातो. हे दृश्य पाहून आजूबाजूचे प्रवासी एकमेकांकडे पाहत राहतात. ‘लोकल ट्रेनमध्ये विचित्र पदार्थ खाणं’ असा व्हिडीओ पाहूनही इतकी अजब कॉम्बिनेशन असतील, याची कुणालाही कल्पना नव्हती.

इतक्यावरच न थांबता, प्रणय कच्चा कोबी आणि कच्ची वांगीही खातो. हे पाहून प्रवाशांच्या भुवया उंचावतात. एक प्रवासी म्हणतो की, तो फक्त टोमॅटोच कच्चा खातो, तर दुसरा थेट विचारतो, "कच्ची वांगी का खातोयस?" यावर प्रणय सांगतो की, "कच्च्या भाज्या खाल्ल्याने आरोग्य चांगलं राहतं, असं अनेक ठिकाणी सांगितलं जातं." लोकलमधील प्रवाशांच्या प्रतिक्रिया टिपणं हाच या व्हिडीओमागचा मुख्य उद्देश असल्याचं स्पष्ट दिसतं. त्याने या व्हिडीओला "२०२६ मध्ये हेल्थ फ्रिक बनायचं आहे." अशी मिश्कील कॅप्शनही दिली आहे.

इंटरनेटवर हास्याची लाट

हा व्हिडीओ आतापर्यंत ३३ मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला असून सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही जण प्रवाशांच्या चेहऱ्यावरच्या भावांवर हसत आहेत, तर काही जण थेट प्रश्न विचारत आहेत, “हे सगळं तो खाऊच कसा शकला?” एका युजरने लिहिलं, “इतकं विचित्र खातानाही तुझ्या चेहऱ्यावर एकही भाव नाही, हेच भारी आहे.” तर दुसऱ्याने गंमतीने म्हटलं, “आल्यावर सॉस… ऐकायलाच भारी वाटतं!”

काही जणांनी मात्र काळजी व्यक्त करत, “पोट ठिक आहे ना?” असा प्रश्नही विचारला आहे. एकूणच, कच्चं आलं सॉसबरोबर, चहात केळं आणि कच्च्या भाज्या हे सगळं पाहणाऱ्यांसाठी हा व्हिडीओ जितका मजेशीर होता, तितकाच तो थोडासा अडचणीचा आणि अस्वस्थ करणारा अनुभव ठरला. मुंबई लोकलमधील हा प्रँक सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

Mumbai : पालिका शाळाही ‘गॅस’वर; मध्यान्ह भोजनात आता विद्यार्थ्यांना फळ वाटप, रुग्णालयांत सिलिंडर पुरवठा करण्यासाठी गॅस कंपनीला पत्र

अमेरिकी तळांवर हल्ले सुरूच ठेवू; इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड झाल्यानंतर मोजतबांचे पहिलेच वक्तव्य, होर्मुझ सामुद्रधुनी बंदच राहणार!

भारत, चीनसह १६ देशांविरुद्ध ट्रम्प लावणार टॅरिफ; व्यापारी भागीदारांविरुद्ध चौकशी सुरू

गॅस टंचाईमुळे लग्न सोहळे अडचणीत; हॉल व्यावसायिकांवर कार्यक्रम पुढे ढकलण्याची वेळ

शिवसेना पक्ष, चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर