Mumbai : ११०० कोटींच्या थकबाकीमुळे महालॅब, डायलिसिस केंद्रांना टाळे संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : ११०० कोटींच्या थकबाकीमुळे महालॅब, डायलिसिस केंद्रांना टाळे

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णांसाठी महालॅब, मोफत डायलिसिस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ या अत्यंत महत्त्वाच्या आरोग्य सेवा पुरविणाऱ्या ‘एचएलएल लाइफ केअर लिमिटेड’ या कंपनीची जवळपास ११०० कोटी रुपयांची देणी राज्य सरकारने थकवली आहेत.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णांसाठी महालॅब, मोफत डायलिसिस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ या अत्यंत महत्त्वाच्या आरोग्य सेवा पुरविणाऱ्या ‘एचएलएल लाइफ केअर लिमिटेड’ या कंपनीची जवळपास ११०० कोटी रुपयांची देणी राज्य सरकारने थकवली आहेत. त्यामुळे कंपनीने १ नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील आपल्या आरोग्य सेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे राज्यभरातील रुग्ण मोफत आरोग्य सेवेपासून वंचित राहू लागले आहेत.

‘एनएचएम’ अंतर्गत ‘एचएलएल लाइफ केअर लिमिटेड’सोबत १० वर्षांचा करार केला. यानुसार ४०० महालॅब, २२५ दवाखाने, ११० डायलिसिस केंद्रे चालवली जातात.

सरकारकडे वारंवार पाठपुरावा

गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकारकडून देयक मिळाले नसल्याने या सेवा चालवणे कठीण झाल्याचे कंपनीने गेल्या महिन्यात सार्वजनिक आरोग्य विभागाला कळविले. गेल्या दोन वर्षांत १ हजार ६७ कोटींचे देयक थकल्याने ४ हजारांहून अधिक कर्मचाऱ्‍यांचे वेतन रखडले आहे. याशिवाय डायग्नोस्टिक किट्स आणि आवश्यक साहित्य खरेदी करणे अशक्य झाले आहे. देयकांबाबत कंपनीने सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, सरकारकडून दाद मिळत नसल्याने शेवटी कंपनीने रविवारपासून सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला.

थकबाकी किती

कंपनीच्या दाव्यानुसार, सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रयोगशाळा निदान सेवांचे ८७७.१५ कोटी रुपये, मोफत डायलिसिस सेवांचे १२६.२७ कोटी रुपये आणि आपला दवाखाना प्रकल्पाचे ६३.८३ कोटी रुपये अशी एकूण १ हजार ६७ कोटी २५ लाख रुपयांची थकबाकी आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

...तर विमान प्रवास करू नका; ७०० टक्के दरवाढ याचिकेवर सुप्रीम कोर्टाची धक्कादायक सूचना

तिकीट दरांमध्ये हस्तक्षेप करण्याचे सरकारला अधिकार; प्रवासी भाड्याबाबत नवे नियम जाहीर

न्यायालये बॉम्बने उडवण्याची धमकी; ठाणे, सांगली, परभणी, हिंगोली, बीड, सोलापूर न्यायालयात आले ई-मेल

राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर? नाराज नेत्यांनी घेतली अमित शहांची भेट; पवार माय-लेक वगळून NCP च्या विलीनीकरणाची चाचपणी

‘दिया’च्या आवाहनावरून गदारोळ; फटाके न फोडण्याच्या मिर्झाच्या वक्तव्याने राजकीय वातावरण पेटले, भाजपच्या आक्षेपानंतर व्हिडीओ गायब