मुंबई

Mumbai : प्रदूषण रोखण्यासाठी झाडाझडती; BMCच्या दणक्यानंतर २२२४ बांधकाम साइट्सवर सेन्सर मशीन कार्यान्वित

मुंबईतील हवेची गुणवत्ता स्थिर आहे की नाही, हे तपासण्यासाठी बांधकाम ठिकाणी सेन्सर्स बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

गिरीश चित्रे

गिरीश चित्रे/मुंबई

मुंबईतील हवेची गुणवत्ता स्थिर आहे की नाही, हे तपासण्यासाठी बांधकाम ठिकाणी सेन्सर्स बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र बांधकाम साइट्सवर प्रत्यक्षात सेन्सर मशीन बसवले की नाही, एक्यूआर चुकीचा तर दाखवत नाही, याची झाडाझडती घेतली जाणार आहे. यासाठी पालिकेच्या टीम बांधकाम साइट्सवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याची माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे उपायुक्त अविनाश काटे यांनी दिली.

मुंबईतील हवा गेल्या काही वर्षांत खालावली असून प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत सुरू असलेल्या बांधकाम ठिकाणी ‘एअर क्वालिटी सेन्सर्स’ कार्यान्वित करणे बंधनकारक केले आहे. तसेच १ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये ‘रेफरन्स ग्रेड एअर क्वालिटी मॉनिटर’ बसविण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. काही बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी संबंधित आदेशांनुसार अत्यावश्यक असणारी ‘वायू गुणवत्ता मापन प्रणाली’ बसविण्यात आली आहे. मात्र बांधकाम ठिकाणी प्रत्यक्षात सेन्सर मशीन बसवले की नाही, सेन्सर मशीन योग्यप्रकारे कार्य करते की नाही, वायू पातळीवर कमी दाखवली जाते का, याची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या २५ विभाग कार्यालयात या टीम जाऊन तपासणी करणार असल्याचे काटे यांनी सांगितले.

मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने प्रदूषणाचे नियमांचे उल्लंघन करणारे पालिका प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. प्रदूषण नियंत्रणाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या १२००हून अधिक बांधकाम प्रकल्पांना स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात आली आहे.

विशेष म्हणजे यापुढेही नियमित पाहणी सुरू राहणार असून नियमभंग करणाऱ्या उर्वरित बांधकामांना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू आहे, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. बांधकाम ठिकाणी सेन्सर मशीन बसवण्यात आले असून मशीन योग्य प्रकारे कार्य करते की नाही याची अपडेट आता सेंट्रल डेटातून वेळोवेळी घेता येतो, असेही ते म्हणाले.

अशी झाली कारवाई

  • एकूण २,२५४ बांधकाम ठिकाणे

  • १२०० बांधकामांना नोटिसा

  • २०२४ बांधकाम ठिकाणे पालिकेच्या निरीक्षणात

दिल्ली विमानतळावर दोन विमानांची धडक; अकासा एअर आणि स्पाइसजेटचे नुकसान, प्रवासी सुखरूप

TCS प्रकरणात दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम चौकशीसाठी नाशिकमध्ये; १५० कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे निर्देश

गोरेगावमधील मोतीलालनगर पुनर्विकासाचा मास्टर प्लान लवकरच; उच्च दर्जाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार

VIDEO : लखनऊमधील झोपडपट्टीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांमुळे शेकडो झोपड्या जळून खाक, अनेक कुटुंबे बेघर

Bigg Boss Marathi 6: पहिली फायनलिस्ट तन्वी कोलते अडचणीत? 'त्या' वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संताप, विजेतेपदाच्या चर्चेला नवं वळण