Mumbai : दुसऱ्या टप्प्यात २९४ आस्थापनांना नोटीस; मराठी पाट्या प्रकरणी ९,७९८ आस्थापनांची झाडाझडती 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : दुसऱ्या टप्प्यात २९४ आस्थापनांना नोटीस; मराठी पाट्या प्रकरणी ९,७९८ आस्थापनांची झाडाझडती

दुकाने व आस्थापनांच्या प्रवेशद्वारावर दिसतील अशा स्वरुपात मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे. मात्र, आजही अनेक दुकाने व आस्थापनांच्या प्रवेशद्वारावर मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष केल्याने दुसऱ्या टप्प्यात २९४ दुकाने व आस्थापनांना नोटीस बजावण्यात आल्याचे विधी समिती अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी सांगितले.

Swapnil S

मुंबई : दुकाने व आस्थापनांच्या प्रवेशद्वारावर दिसतील अशा स्वरुपात मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे. मात्र, आजही अनेक दुकाने व आस्थापनांच्या प्रवेशद्वारावर मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष केल्याने दुसऱ्या टप्प्यात २९४ दुकाने व आस्थापनांना नोटीस बजावण्यात आल्याचे विधी समिती अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी सांगितले. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात शॉपिंग मॉल, नामांकित आस्थापना रडारवर असून मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनाला आल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा कारकर यांनी दिला आहे.

मुंबईतील दुकाने व आस्थापनांना दिसतील अशा प्रकारे मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात मुंबईतील ३६ हजार ७७३ आस्थापनांची झाडाझडती घेतली. यात १,१२४ आस्थापनांचा अहवाल तयार केला असता १,१२४ अस्थापनांना न्यायालयात खेचण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मराठी नामफलक न लावणाऱ्या ६३८ दुकानांवर आणि आस्थापनांवर महापालिकेने न्यायालयात दावे दाखल केले असून त्यापैकी १४३ आस्थापनांवरील न्यायालयीन खटल्यांची कारवाई अंतिम टप्प्यात आहे तर काही प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यासाठी आलेल्या अर्जापैकी १९० आस्थापनांच्या मालकांकडून १२ लाख २३ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मराठी नामफलकांसाठी मुंबईचे उपमहापौर संजय घाडी व मुंबई महापालिकेच्या विधी समिती अध्यक्षा दीक्षा कारकर यांच्या पुढाकाराने पहिल्या टप्प्यात मे महिन्यापासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती.

कारवाईचा बडगा उगारणे सुरू

दुसऱ्या टप्प्यात मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात २० ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान एस. व्ही. रोड व एलजीएस रोडवरील तब्बल ९,७९८ दुकाने व आस्थापनांची झाडाझडती घेतली. यात २९४ दुकाने व आस्थापनांनी प्रवेशद्वारावर दिसतील अशा स्वरूपात मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दुकाने व आस्थापना विभागाच्या निदर्शनाला आले आहे. त्यामुळे २९४ दुकाने व आस्थापनांना नोटीस बजावण्यात आल्याचे दीक्षा कारकर यांनी सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

RBI New Rules : आता एका क्लिकवर थांबवता येणार डिजिटल पेमेंट; 'स्टॉप स्विच'सह आरबीआयचे नवे नियम, वाचा सविस्तर

Mumbai : गुरुवारी, शुक्रवारी पाणीबाणी; धारावी, वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, भांडुपमध्ये पाणी नाही

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी; FIR दाखल, पोलिसांकडून तपास सुरू

Pune : साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध, लग्नालाही घरच्यांचा होकार; तरीही संशयावरून वाद, प्रियकराने आयटी इंजिनिअर प्रेयसीला संपवलं

नवरा वारंवार माहेरी पाठवायचा, संशय आल्याने बायकोने घरात लावले CCTV; फुटेज पाहून पायाखालची जमीनच सरकली