Mumbai : रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये आग; एका डब्याचे मोठे नुकसान 
मुंबई

Mumbai : रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये आग; एका डब्याचे मोठे नुकसान

मध्य रेल्वेच्या माटुंगा येथील वर्कशॉपमध्ये मंगळवारी दुपारी एका नॉन-एसी स्लीपर डब्याला भीषण आग लागली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुपारी ३.१० वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वेच्या माटुंगा येथील वर्कशॉपमध्ये मंगळवारी दुपारी एका नॉन-एसी स्लीपर डब्याला भीषण आग लागली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुपारी ३.१० वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि दुपारी ४ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, असे मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले. जोरदार वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली आणि या रेल्वे डब्याचा वरचा सुमारे ७० टक्के भाग आगीत जळून खाक झाला, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी दिली.

वेल्डिंगच्या ठिणग्यांमुळे लागली आग

प्राथमिक तपासानुसार, वर्कशॉपमध्ये सुरू असलेल्या वेल्डिंगच्या कामातून उडालेल्या ठिणग्यांमुळे जवळच असलेल्या साहित्याने पेट घेतला आणि ही आग लागली. आग लागलेला डबा तातडीने खुल्या जागेत हलवण्यात आला. मध्य रेल्वेचे हे ११० वर्षे जुने वर्कशॉप रेल्वेगाड्यांच्या देखभालीसाठी आणि दुरुस्तीसाठी ओळखले जाते.

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी