Mumbai : अखेर महापौरांच्या गाडीसमोरील दिवे उतरले 
मुंबई

Mumbai : अखेर महापौरांच्या गाडीसमोरील दिवे उतरले

गाडीवर लाल दिव्यांवर केंद्र सरकारची बंदी असतानाही मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या व्हीआयपी गाडीच्या समोरील बाजूस लाल-निळे लखलखणारे दिवे लावण्यात आले होते. याबाबतचे वृत्त दैनिक 'नवशक्ति'मध्ये प्रसिद्ध होताच त्याच दिवशी ते दिवे काढून टाकण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

Swapnil S

मुंबई : गाडीच्या टपावर किंवा गाडीसमोर लाल दिव्यांच्या वापरावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. मात्र, मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर रितू तावडे यांच्या व्हीआयपी गाडीच्या समोरील बाजूस लखलखणारे लाल आणि निळ्या रंगाचे दिवे लावण्यात आले होते. यासंदर्भातील वृत्त दैनिक ‘नवशक्ति’ने रविवारच्या अंकात छापताच, त्याच दिवशी महापौरांच्या व्हीआयपी गाडीसमोरील बाजूस असलेले लखलखणारे दिवे उतरवण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

मुंबईच्या प्रथम नागरिक, महापौर रितू तावडे यांच्या व्हीआयपी गाडीच्या टपावरील लाल दिवा उतरवण्यात आला आहे. मात्र, गाडीच्या पुढील बाजूस महापालिकेचे बोधचिन्ह असलेल्या ठिकाणी लाल आणि निळ्या रंगाचे लखलखणारे दिवे लावण्यात आले होते. गाडीवर लाल दिव्याचा वापर करण्यावर केंद्र सरकारने एप्रिल २०१७ मध्ये बंदी घातली आणि मे २०१७ पासून अंमलबजावणीही सुरू झाली. तरीही महापौरांच्या व्हीआयपी गाडीच्या पुढील बाजूस लाल व निळ्या रंगाचे लखलखणारे दिवे झळकत असल्याचे वृत्त दैनिक ‘नवशक्ति’ने प्रसिद्ध केले. या बातमीची दखल घेत मुंबई महापालिका प्रशासनाने महापौरांच्या व्हीआयपी गाडीच्या पुढील बाजूस असणारे लाल व निळ्या रंगाचे लखलखणारे दिवे उतरवले आहेत.

गाडीसमोरील दिवे उतरले

पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण झाल्यावर त्यांना वाहने पुरवली जातात. या वाहनांवरील लुकलुकणाऱ्या दिव्यांसंदर्भातील बाब निदर्शनास येताच पदाधिकारी यांच्या वाहनावरील लुकलुकणारे दिवे काढून टाकण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती