मुंबई

Mumbai : १४.४० लाखांच्या शैक्षणिक फसवणुकीत दोघांना अटक; रक्कम वसूल

वैद्यकीय "मंत्रालयीन शिक्षणातील कोटा" तून एमबीबीएस सीट मिळवून देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील रहिवाशाची १४.४० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना आजाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी संपूर्ण रक्कम परत मिळवून तक्रारदारास १००% नुकसानभरपाई मिळवून दिली आहे.

Swapnil S

पूनम अप्रज/ मुंबई

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या प्रकरणाची नोंद आजाद मैदान पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४२०, ३४ अंतर्गत करण्यात आली आहे. तक्रारदार हा धोबी तलाव, मुंबई येथील ४३ वर्षीय रहिवासी असून त्याने आरोप केला की, २६ मे २०२२ ते २९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत आरोपींनी त्याच्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन देत एकूण १४,४०,००७ रुपये उकळले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख कृष्ण मोहन विष्णुदत्त शर्मा (४६, रा. आग्रा, दिल्ली) आणि एनुल झेनुल हसन (३२, रा. धीरज नगर, टांडा तहसील, रामपूर, उत्तर प्रदेश) अशी झाली आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

समुद्रकिनारे धोक्यात! CRZ ‘बफर झोन’ ५०० वरून २०० मीटर करण्याचा नीती आयोगाचा प्रस्ताव, पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली नाराजी

अंदमान-निकोबार बेटांवर चक्रीवादळ धडकणार; हवामान खात्याचा इशारा

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील हवा ‘अतिशय खराब’; दिल्लीकरांनी घेतला विषारी श्वास, हवेचा एक्यूआय ३०० च्या पुढे

‘INS विक्रांत’ने पाकची झोप उडवली! नौदल कर्मचाऱ्यांबरोबर दिवाळी साजरी करीत मोदींनी केले नौदलाचे कौतुक

...तर आणखी ‘टॅरिफ’ लावू! ट्रम्प यांची भारताला धमकी; भारत-पाक युद्ध थांबविल्याचा पुनरुच्चार