मुंबई

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दोन दिवस ब्लॉक, २७७ लोकल रद्द

पश्चिम उपनगरात राहणाऱ्या आणि प्रवासासाठी पश्चिम रेल्वेवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना येत्या शुक्रवारी आणि शनिवारी रात्री लवकर कामावरून घराकडे परतावे लागणार आहे.

Swapnil S

मुंबई : पश्चिम उपनगरात राहणाऱ्या आणि प्रवासासाठी पश्चिम रेल्वेवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना येत्या शुक्रवारी आणि शनिवारी रात्री लवकर कामावरून घराकडे परतावे लागणार आहे. माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान पूल क्रमांक २० च्या शुक्रवार-शनिवार पुनर्बांधणीसाठी आणि शनिवार-रविवारी रात्रकालीन ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. ब्लॉकमुळे शेवटच्या लोकलमधील वेळेत बदल करण्यात आल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

शुक्रवार-शनिवारी अप आणि डाउन धीम्या मार्गावर मध्य रात्री नऊ आणि जलद मार्गावर सात तासांचा तर, शनिवार-रविवार मध्यरात्री धीम्या मार्गावर नऊ आणि जलद मार्गावर दहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शुक्रवार-शनिवार दरम्यानच्या मध्यरात्री घेणाऱ्या ब्लॉकमुळे सुमारे १२७ लोकल फेऱ्या पूर्णतः आणि ६० अंशतः रद्द केल्या जातील. शनिवार -रविवार दरम्यानच्या मध्यरात्री १५० लोकल फेऱ्या पूर्णतः आणि ९० अंशतः रद्द करण्यात येणार आहे. त्याचबरोबर २४ मेल-एक्स्प्रेसवर याचा परिणाम होणार आहे. परिणाम होणाऱ्या मेल-एक्स्प्रेसच्या माहितीसाठी पश्चिम रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

शनिवार, २५ आणि रविवार, २६च्या ब्लॉकमुळे होणारा परिणाम

-मार्ग अप-डाऊन धीमा आणि अप-डाऊन जलद

-वेळ - शुक्रवारी रात्री ११ ते शनिवारी सकाळी ८.३० आणि शुक्रवारी मध्यरात्री ११ ते शनिवार पहाटे ७.३०

-परिणाम शनिवारी रात्री १०.०७ विरार-चर्चगेट ही शेवटची जलद लोकल असणार आहे. शनिवारी रात्री ते रविवारी सकाळी, विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईंदर आणि बोरिवली येथून धावणाऱ्या धीम्या आणि जलद दोन्ही गाड्या अंधेरीपर्यंत धावतील. गोरेगाव आणि वांद्रेदरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.

२५-२६ जानेवारी शेवटची लोकल

-रात्री ११.०७ विरार-चर्चगेट (जलद)

-रात्री १०.२२ बोरिवली-चर्चगेट (धीमी)

-रात्री १०.३३ चर्चगेट-बोरिवली (जलद)

-रात्री १०.२६ चर्चगेट-भाईंदर (धीमी)

रद्द मेल-एक्स्प्रेस २५-२६ जानेवारी

-गाडी क्रमांक १२२६७/८, मुंबई सेंट्रल-हापा-मुंबई सेंट्रल दुरांतो

-गाडी क्रमांक १२२२७/८, मुंबई सेंट्रल-इंदूर-मुंबई सेंट्रल दुरांतो

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल