मेट्रो-३ साठी आता सवलतीच्या दरात पास; बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सवलत, प्रवास खर्च २५ टक्क्यांनी कमी 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

मेट्रो-३ साठी आता सवलतीच्या दरात पास; बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सवलत, प्रवास खर्च २५ टक्क्यांनी कमी

मेट्रो-३ म्हणजेच ॲक्वा लाइनने मुंबईकर विद्यार्थी, दिव्यांग आणि पर्यटकांना दिलासा दिला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) विशेष सवलतीच्या पासची घोषणा केली आहे.

Swapnil S

मुंबई : मेट्रो-३ म्हणजेच ॲक्वा लाइनने मुंबईकर विद्यार्थी, दिव्यांग आणि पर्यटकांना दिलासा दिला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) विशेष सवलतीच्या पासची घोषणा केली आहे. त्यानुसार बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सवलत देण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा खर्च २५ टक्क्यांनी कमी होणार आहे.

शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने मेट्रोने प्रवास करतात. या विद्यार्थ्यांना एमएमआरसीने प्रवासात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार इयत्ता १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सवलत लागू केली आहे. ‘डिजिटल मोबिलिटी’ला चालना देण्यासाठी हे सर्व पास नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) वर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ४५ आणि ६० ट्रिपच्या पासवर २५ टक्के थेट सवलत देण्यात आली आहे. या पासची वैधता ३० दिवस असेल. यामुळे विद्यार्थ्यांचा दरमहा प्रवासाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.

पर्यटकांच्या सेवेसाठी ‘अमर्यादित’ मेट्रो राइड

मुंबई फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यकांसाठी मेट्रोने खास ‘टुरिस्ट पास’ सादर केले आहेत. एकदा पास काढला की कितीही वेळा प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे. १ दिवसाचा अमर्यादित प्रवास पास फक्त २८० रुपयांना मिळणार आहे, तर ३ दिवसांचा पास ७०० रुपयांना मिळणार आहे.

दिव्यांग आणि नियमित प्रवाशांनाही लाभ

दिव्यांग प्रवाशांनाही ४५ आणि ६० ट्रिप पासवर २५ टक्के सवलत कायम ठेवण्यात आली आहे. तसेच नियमित नोकरदार वर्गासाठी मेट्रो कनेक्ट-३ या ॲपवर ४५ ट्रिपसाठी १० टक्के आणि ६० ट्रिपसाठी १५ टक्के सवलत आता एनसीएमसी कार्डच्या माध्यमातून घेता येईल.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली