मुंबई

Mumbai : मेट्रो लोकार्पणाला अखेर उद्याचा मुहूर्त

बहुप्रतीक्षित दहिसर-मीरा भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचा टप्पा १ आणि डी. एन. नगर ते मंडाले, मानखुर्द मेट्रो २ ब मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे अखेर ७ एप्रिल रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे. पूर्व उपनगरात मेट्रो २ ब मार्गिकेच्या निमित्ताने पहिली मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

Swapnil S

मुंबई : बहुप्रतीक्षित दहिसर-मीरा भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचा टप्पा १ आणि डी. एन. नगर ते मंडाले, मानखुर्द मेट्रो २ ब मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे अखेर ७ एप्रिल रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे. पूर्व उपनगरात मेट्रो २ ब मार्गिकेच्या निमित्ताने पहिली मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या दोन मेट्रो मार्गिकांसह ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच पॉड टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजनही ७ एप्रिल रोजी पार पडणार आहे.

मेट्रो लाईन ९ मार्गिकेचा पहिला टप्पा आणि मेट्रो लाइन २ ब मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ३ एप्रिल रोजी करण्याचे नियोजन एमएमआरडीएने केले होते. मात्र काही कारणांमुळे या दोन मार्गिकांचे लोकार्पण लांबणीवर गेले होते. अखेर एमएमआरडीएने या मार्गिकांच्या लोकार्पणाची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार ७ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग