मुंबई

‘मेट्रो-३’च्या प्रवाशांसाठी आता सवलतीत मासिक पास, पास सुविधा देणारी ‘मेट्रो-३’ देशातील पहिली मेट्रो

‘मेट्रो मार्ग ३’वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना २८ नोव्हेंबर २०२५ पासून सवलतींसह ट्रिप-आधारित पास खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’द्वारे शुक्रवारपासून ‘मेट्रो-३’च्या ‘मेट्रो कनेक्ट ३’ मोबाईल ॲपवर सवलतीचे मासिक पास उपलब्ध करण्यात आले आहेत. मोबाईल ॲपद्वारे पास सुविधा देणारी ‘मेट्रो-३’ ही देशातील पहिली मेट्रो ठरली आहे.

‘मेट्रो मार्ग ३’वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना २८ नोव्हेंबर २०२५ पासून सवलतींसह ट्रिप-आधारित पास खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार ६० ट्रिप पासवर १५ टक्के सवलत, तर ४५ ट्रिप पासवर १० टक्के सवलत देण्यात आली आहे.

प्रवास अधिक किफायतशीर करण्यासाठी तसेच तिकीट खरेदीची प्रक्रिया अधिक सोपी, डिजिटल आणि संपर्कविरहित करण्याच्या उद्देशाने हे पास तयार करण्यात आले आहेत. ‘मेट्रो कनेक्ट ३’ ॲपवर सोप्या पद्धतीने प्रवासी पास खरेदी करून थेट मोबाईलद्वारे पास वापरू शकतात. यामुळे भौतिक तिकिटाची आवश्यकता राहणार नाही. ‘मेट्रो कनेक्ट ३’ ॲप अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

Mumbai : रविवार ठरला घातवार! विविध अपघातांमध्ये ५ जण ठार, ९ जखमी

Maharashtra TET Paper Leak : दोन फरार आरोपींना अटक

अडवाणी, सिसोदियांना नोटीस; मतदारयादी तपासणीमध्ये पूर्वीच्या यादीशी मेळ न जुळल्याने कारवाई

परतीचा प्रवासही मुंगीच्या गतीने; मुंबई-गोवा मार्गावर वाहतूककोंडी

जरांगे माघारीचे नाट्य, पडद्याआडच्या कुरापती....!