प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : अंधेरी-घाटकोपर प्रवाशांना मोठा दिलासा; मेट्रो वन आता दर ३ मिनिटांनी धावणार

मुंबई मेट्रो वनने गर्दीच्या वेळेत प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी 'मिक्स्ड-लूप ऑपरेशन' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई मेट्रो वनने गर्दीच्या वेळेत प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी 'मिक्स्ड-लूप ऑपरेशन' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. १० ऑगस्टपासून गर्दीच्या वेळेत ही सुधारित सेवा कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे अंधेरी आणि घाटकोपरदरम्यान मेट्रोच्या फेऱ्या वाढणार आहेत. या निर्णयानुसार घाटकोपर-

अंधेरी या मार्गावर (शॉर्ट लूप) चालवण्यात येणार आहेत तर त्यानंतरची मेट्रो नेहमीच्या घाटकोपर-वर्सोवा पूर्ण मार्गावर धावणार आहे. त्यामुळे अंधेरी-घाटकोपरदरम्यानचा प्रवास ३ मिनिटे २० सेकंदांवरून कमी होऊन ३ मिनिटे होणार आहे. या बदलामुळे या सर्वाधिक वर्दळीच्या मार्गिकेची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता २० टक्क्यांहून अधिक

वाढणार असून सुमारे २८ हजार अतिरिक्त प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे तसेच वर्सोवा-आझाद नगरदरम्यान पीक अवर हेडवे ३६२ सेकंद राहणार आहे.

फेऱ्या वाढवल्या, ८५ टक्के प्रवाशांना फायदा

सेवावाढीमुळे आठवड्याच्या कामकाजाच्या दिवशी धावणाऱ्या मेट्रोच्या फेऱ्यांची संख्या ४७६ वरून ४८४ होणार आहे. अंधेरी डाऊन प्लॅटफॉर्मवरून पहिली शॉर्ट-लूप मेट्रो सायंकाळी ६.२३ वाजून ६ सेकंदांनी, तर शेवटची शॉर्ट-लूप मेट्रो रात्री ८.२३ वाजून ४६ सेकंदांनी सुटणार आहे. या सुधारणेचा थेट फायदा मेट्रो वनच्या ८५ टक्क्यांहून अधिक प्रवाशांना, विशेषतः घाटकोपर-अंधेरीदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. त्यामुळे मेट्रोची वारंवारता वाढण्याबरोबरच प्रवाशांचा प्रतीक्षा वेळ कमी होऊन सर्वाधिक गर्दीच्या विभागात अतिरिक्त प्रवासी क्षमता उपलब्ध होणार आहे.

मिक्स्ड-लूप ऑपरेशन हा विद्यमान पायाभूत सुविधांची क्षमता अधिक प्रभावीपणे वापरण्याच्या आमच्या प्रयत्नांचा भाग आहे. गर्दीच्या वेळेत ही कार्यपद्धती सुरू करून प्रवाशांचा प्रतीक्षा वेळ कमी करणे, वाहतूक क्षमता वाढवणे आणि अधिक वेगवान, सोयीस्कर व विश्वासार्ह सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
श्यामंतक चौधरी, सीईओ, मुंबई मेट्रो वन

Mumbai : १४ फूट उंच झोपड्यांच्या कारवाईवरून विरोधक आक्रमक; काँग्रेस, ठाकरेंच्या शिष्टमंडळांनी घेतली आयुक्तांची भेट

Kolhapur : भरधाव Ertiga ची दुचाकीला जबर धडक; पती-पत्नी थेट हवेत; एकजण जागीच ठार, अंगावर काटा आणणारा Video व्हायरल

समुद्रातील तरंगता कचरा हटवण्यासाठी रोबोटिक बोटी; ३.६ कोटींच्या प्रकल्पाला BMC ची मंजुरी, गेट वे, बधवार पार्क येथील प्रयोग यशस्वी

मुंबई मेट्रो वनची व्यवस्थापन क्षेत्रात भरारी; एकात्मिक आयएमएस-आयएसएमएस प्रमाणपत्र मिळवणारी देशातील पहिली मेट्रो

Mira-Bhayandar : कृत्रिम तलावांतील मूर्तींवर जेसीबीने भराव; पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल