Photo : X
मुंबई

स्वप्ननगरी ही ओळख प्रतिबिंबित व्हायला हवी - मुख्यमंत्री; मेट्रो खांबांचे ८६ टक्के संकल्पनाधारित रंगकाम पूर्ण

मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रोच्या एकूण २ हजार ९६२ खांबांपैकी २ हजार ५३७ खांबांवर म्हणजे सुमारे ८६ टक्के खांबांवर संकल्पनाधारित रंगकाम पूर्ण करण्यात आले आहे, तर उर्वरित खांबांचे काम पावसाळ्यानंतर पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रोच्या एकूण २ हजार ९६२ खांबांपैकी २ हजार ५३७ खांबांवर म्हणजे सुमारे ८६ टक्के खांबांवर संकल्पनाधारित रंगकाम पूर्ण करण्यात आले आहे, तर उर्वरित खांबांचे काम पावसाळ्यानंतर पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

दरम्यान, मुंबई ही स्वप्ननगरी आहे आणि मुंबईच्या पायाभूत सुविधांमधूनही तीच उमेद, ती स्वप्ने प्रतिबिंबित व्हायला हवीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) शहराच्या सुशोभीकरण आणि सार्वजनिक सुविधा उपक्रमात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या उपक्रमांतर्गत, मेट्रो मार्गाशी संबंधित खांबांवर विशिष्ट संकल्पना आणि रंगसंगती वापरून रंगकाम करण्यात आले आहे. उदाहरणार्थ, एखादा मेट्रो मार्ग 'रेड लाइन' म्हणून ओळखला जात असेल, तर त्या मार्गावरील खांब लाल रंगातील डिझाइनद्वारे सजवले जातील, जेणेकरून त्या मार्गाची ओळख स्पष्टपणे अधोरेखित होईल.

राबविण्यात एमएमआरडीएतर्फे आलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. तसेच प्रवाशांना विविध मेट्रो मार्ग ओळखणे आणि समजून घेणे अधिक सोपे झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मेट्रो खांब सुशोभीकरण उपक्रम हा जागतिक दर्जाची सार्वजनिक परिवहन व्यवस्था उभारण्यासोबतच शहराचा चेहराही अधिक आकर्षक, देखणा आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे द्योतक आहे.

मुंबईतील मेट्रो व्यवस्था ही फक्त एक वाहतुकीचे साधन नसून शहराच्या चैतन्याचे प्रतीक आहे. खांब सुशोभीकरण उपक्रम म्हणजे शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत असलेल्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. हा उपक्रम म्हणजे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये शहराची ओळख गुंफण्याचा प्रयत्न आहे.
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, एमएमआरडीए अध्यक्ष

पार्किंगच्या वादातून अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या; CCTV फूटेज आले समोर; दोघांना अटक

रायगडमध्ये पालकमंत्रिपदाचा तिढा अद्यापही कायम; झेंडावंदन करण्यावरून राष्ट्रवादी-शिवसेनेत तू तू मैं मैं

यंदा नारळी पौर्णिमा, गौरी विसर्जनाची सुट्टी; अनंत चतुर्दशी, दहीहंडीची सुट्टी रद्द

सोन्याचा भाव विक्रमी ३,६०० रुपयांनी वाढला; सुरक्षित मालमत्तेतील गुंतवणुकीचा परिणाम

ED बदमाशासारखे काम करू शकत नाही! कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे; सुप्रीम कोर्टाने फटकारले