मुंबई

मुंबई मेट्रो स्थानकाला ‘गळती’

अतिक शेख

मुंबई : मुंबई मेट्रोचे ‘२ ए’ व ७ हे मार्ग सुरू झाले आहेत. ही स्थानके नवीन असून, पावसाळ्यात यातून गळती सुरू झाली आहे. या स्थानकात बादल्या ठेवण्याची वेळ मेट्रो प्रशासनावर आली आहे. यामुळे बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मुंबई मेट्रो २ ए मार्गावर दहिसर पूर्व ते अंधेरी (प.) व मेट्रो ७ हा मार्ग दहिसर पूर्व ते गुंदवली दरम्यान आहे. या दोन मार्गिकांची उभारणी एमएमआरडीएने केली आहे, तर परिचलन व देखभाल ही महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडकडून केली जाते.

या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सोशल मीडियावरून या ‘गळती’ची व्यथा मांडली आहे, तर काही स्थानकांच्या भिंतीतून गळती होत आहे. दहिसर (पू.) मेट्रो स्थानकात अनेक ठिकाणी गळती होत आहे. या स्थानकात अनेक ठिकाणी बादल्या ठेवण्याची वेळ आली आहे, असे अभिषेक मुंधरा या प्रवाशाने सांगितले.

तर विवेक शर्मा या प्रवाशाने सोशल मीडियावर म्हटले की, कितीही पैसे खर्च केले तरीही मुंबईच्या पावसाळ्यात बादली कामाला येतेच. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी सुरू असलेल्या कांदिवली (प.) स्थानकातील परिस्थितीही अशीच आहे.

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे व गुंदवली मेट्रो रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या ब्रीजवरील छतच टाकलेले नाही, अशी तक्रार काही प्रवाशांनी केली. मेट्रो स्थानकात होणारी गळती एमएमआरडीए व एमएमएमओसीएलच्या निदर्शनास आणून दिली.

त्यावर या दोन्ही संस्थांनी खुलासा करताना सांगितले की, उघड्या दर्शनी भागामुळे स्थानकांमध्ये पाणी शिरते आणि भिंती ओलसर होतात. आम्‍हाला या समस्येची पूर्ण जाणीव आहे आणि ती सोडवण्‍यासाठी काम करत आहोत. आमचे कर्मचारी स्थानकांमध्‍ये कोणत्याही गळती किंवा प्रवेशाचे ठिकाण ओळखण्यासाठी नियुक्त केलेला आहे. आम्ही रेल्वे स्थानकाची वेळोवेळी तपासणी करत असतो. या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. प्रवाशांसाठी चांगली सुविधा देण्याचे महत्त्व आम्हाला आहे.

सुधारणा करण्याचे काम सातत्याने
‘‘आमच्या स्टेशनमध्ये सुधारणा करण्याचे काम आम्ही सातत्याने करत आहोत. प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’’ -सुशील चंद्रा, संचालक (देखभाल), एमएमएमओसीएल

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त