(संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mumbai Metro: गणेशोत्सवात मुंबई मेट्रो उशिरापर्यंत धावणार

गणेशोत्सवाननिमित्त रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी वर्सोवा अंधेरी घाटकोपर या मेट्रो १ची सेवा रात्री उशिरापर्यंत चालविण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : गणेशोत्सवाननिमित्त रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी वर्सोवा अंधेरी घाटकोपर या मेट्रो १ची सेवा रात्री उशिरापर्यंत चालविण्यात येणार आहे. १७ सप्टेंबरपर्यंत या सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येईल.

गणपती दर्शनासाठी प्रवाशांच्या सेवेसाठी मेट्रो १ प्रशासनाने रात्रीच्या सेवेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

वर्सोवा ते घाटकोपर ही शेवटची सेवा यापूर्वी ११.२० वाजता चालविण्यात येत होती. गणेशोत्सवासाठी वर्सोवा ते घाटकोपर ही शेवटची मेट्रो सेवा रात्री १२. १० वाजता चालविण्यात येणार आहे. तर घाटकोपर ते वर्सोवा ही शेवटची सेवा अगोदर ११.४५ वाजता चालविण्यात येत होती. ही सेवा रात्री १२:४० वाजता चालविण्यात येणार आहे.

१५ जानेवारीला मतदानासाठी सुट्टी, सवलत नाही? 'या' क्रमांकावर साधा संपर्क

एकीकडे नवजात बाळाचा जन्म, दुसरीकडे जवान पतीचे अंत्यदर्शन; साताऱ्यातील काळीज पिळवटून टाकणारा Video व्हायरल

भटक्या कुत्र्यांसाठी मिका सिंगची सर्वोच्च न्यायालयाला विनंती; १० एकर जमीन दान करण्याची तयारी

'लाडकी बहीण'चे पैसे निवडणुकीनंतरच द्या! काँग्रेसचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र

Bigg Boss Marathi 6 च्या घरात कोण कोण? फायनल यादी पाहा